Hair Care Tips: महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! आठवड्यातून एकदा केसांना लावा 'हा' होममेड आयुर्वेदिक शाम्पू

Hair Care Tips: केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी महागड्या शाम्पूचा वापर न करता आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून घरीच शाम्पू बनवावा. या शाम्पूच्या वापरामुळे टाळूवर इन्फेक्शन किंवा कोंडा स्वच्छ होण्यास मदत होईल.
महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! आठवड्यातून एकदा केसांना लावा 'हा' होममेड आयुर्वेदिक शाम्पू
महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! आठवड्यातून एकदा केसांना लावा 'हा' होममेड आयुर्वेदिक शाम्पू
Published on: 
Updated on: 
  • केस गळण्याची कारणे?

  • आयुर्वेदिक शाम्पू बनवण्याची कृती?

  • केसांच्या वाढीसाठी कोणते घरगुती उपाय करावे?

Hair Care Tips: केस गळणे अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अगदी तरुण वयातील मुलामुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांचे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांमध्ये टक्कल पडून केसांचे सौंदर्य कमी होऊन जाते. केस गळणे, केसांमध्ये टक्कल पडणे किंवा केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर मास्कचा वापर केला जातो तर कधी हेअर केअर रुटीनमध्ये वारंवार बदल केला जातात. जीवनशैलीत सतत होणारे बदल, पोषणाचा अभाव, आहारामधील कमतरता, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. (फोटो सौजन्य – istock)

केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. केस स्वच्छ करण्यासाठी शाम्पू, कंडिशनर, हेअर सीरम, हेअर मास्क इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. बाजारातील शाम्पूमध्ये सल्फेट आणि इतर हानिकारक घटक असतात. ज्यांच्या परिणामामुळे केस खूप जास्त कोरडे होऊन जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून होममेड हेअर शाम्पू बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या शाम्पूचा वापर केल्यामुळे केस स्वच्छ होण्यासोबतच टाळूवर वाढलेला कोंडा सुद्धा कमी होतो.

साहित्य:

  • रिठा

  • शिकाकाई

  • आवळा

  • मेथी दाणे

  • जवस

  • कढीपत्त्याची पाने

  • कडुलिंबाची पाने

  • जास्वदींची पाने आणि फुले

  • कोरफड जेल

  • पाणी

शाम्पू बनवण्याची कृती:

आयुर्वेदिक शाम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम, रिठा, शिकाकाई, आवळा, मेथी दाणे आणि जवस १ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी तयार पाण्याचे मिश्रण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात जास्वंद, कढीपत्ता, कडुलिंब आणि कोरफड जेल घालून मिक्स करा आणि टोपातील मिश्रण अर्धा होईपर्यंत गरम करून घ्या. त्यानंतर कोमट केलेले मिश्रण गाळणीच्या मदतीने गाळून घ्या. तयार केलेला शाम्पू बाटलीमध्ये भरून ठेवा आणि नियमित केस धुवताना वापर करावा.

शाम्पूचा वापर करताना सगळ्यात आधी केसांवर पाणी ओतून केस ओले करा. त्यानंतर तयार केलेला शाम्पू हातांवर घेऊन टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. ३ ते ४ मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून टाका. या शाम्पूचा आठवड्यातून दोनदा वापर करू शकता. रिठा-शिकाकाई डोळ्यात गेल्यानंतर जळजळ होण्याची जास्त शक्यता असते. जवस, जास्वंद आणि एलोवेरा जेल केसांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे कोणत्याही कंडिशनरचा वापर करावा लागणार नाही. यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स केसांसाठी गुणकारी ठरतात.