
असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं. प्रेमात पडल्यावर माणूस जात-धर्म, पैसा-धन, वय अन् वेळ काहीच पाहत नाही. याबाबत अनेक उदाहरणे तुम्ही पाहिले असावेत. असंच एक प्रकरण आता समोर आलंय. एका महिलेला पाच नवरे असतानाही ती आणखी एकाच्या प्रेमात पडली मात्र तीने अशी एक चूक केली की तिच्या या लव्हस्टोरीचा शेवट झालाय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.
कोणी म्हणतं की प्रेम हे एकदाच होतं पण याला अपवाद ठरली आहे एक ब्रिटेनची महिला. ब्रिटेनमध्ये राहणाऱ्या एमिलीला पाच नवरे आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे तिचं मन सहाव्या व्यक्तीवर आलं होतं. खर तर ही महिला एक एक लग्न करत गेली पण हिने कुणालाच घटस्फोट दिला नाही. आता या महिलेला एक आणखी व्यक्ती आवडायला लागला. मात्र पाच नवरे असल्याचं तिने या सहाव्या व्यक्तीपासून लपवलं आणि याच खोटारड्यापणावरुन तिचं हे नातं तुटलंय.
पाच पुरुषांची बायको एमिली हॉर्ने 18 महीन्यापासून या सहाव्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र तिने पाच नवऱ्यांचं सत्य लपवून ठेवलं होतं पण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा हे नातं तुटलं. एमिलीची या सहाव्या व्यक्तीसोबत पहिल्यांदा भेट हॉस्पिटलमध्ये झाली होती. तिचं त्यावेळी एक छोटसं ऑपरेशन होतं.
या दरम्यान हे दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही लग्न करण्याचा विचार करत होते मात्र 18 महिन्यानंतर एमिली आपल्याला फसवत असल्याचा भास या सहाव्या व्यक्तीला झाला त्यानंतर त्याने चौकशी केली असता तिला पाच नवरे असल्याचे समोर आले. एका पेक्षा जास्त पुरुषांसोबत लग्न करण्याच्या गुन्ह्याखाली सन 2004 मध्ये एमिलीला पहिल्यांदा सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या सोशल मीडिया वर हे प्रकरण चांगलचं गाजतयं.