श्रावणी सोमवाराला बनवून पहा चवदार गूळ मखाणे, फक्त 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी
श्रावण महिना अखेर सुरु झाला आहे. हिंदू धर्मात हा महिना एक पवित्र महिना म्हणून ओळखला जातो. व्रत-वैकल्याचा महिना म्हणूनही याची ओळख आहे. हा महिना संपूर्णपणे भगवान शंकराला समर्पित असून अनेकजण या महिन्यात उपवास करत असतात. आता उपवास म्हटलं की, अनेक गोष्टी खाणे या वर्ज्य असते. त्यामुळे आपल्याला कितीही भूक लागली तरी आपण फक्त काही निवडक पदार्थांचाच आस्वाद घेऊ शकतो.
तुम्हीही या श्रावणात उपवास केला असेल आणि स्नॅक्ससाठीचा एक चविष्ट पदार्थ शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला गूळ मखाण्यांची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी चवीला फार अप्रतिम लागते आणि संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही याचा समावेश करू शकता. मुख्य म्हणजे या रेसिपीला बनवायला ना जास्त सामग्री आणि जास्त वेळ लागतो. त्यामुळे घाईघाडबडीच्या वेळेस तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – अंबानींच्या घरात नाश्त्याला बनतो हा 60 रुपयांचा पदार्थ, फायदे वाचून तुम्हीही कराल आहारात समावेश