
फोटो सौजन्य- .istock
आयुर्वेदामध्ये मनुके भिजवून त्याचे पाणी पिण्याचे खूप फायदे सांगितले गेले आहेत. मनुक्याचे पाणी पिण्याचे शरीराला खूप फायदे होतात.
मनुका हे असे कोरडे फळ आहे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मनुक्याचे रोज सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून वाचवता येते. आयुर्वेदामध्ये मनुके भिजवून त्य़ाचे पाणी पिण्याचे खूप फायदे सांगितले गेले आहे. मनुका पाण्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मनुकामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंटसारखे अनेक गुणधर्म असतात जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया.
मनुका पाणी पिण्याचे फायदे
वजन कमी करणे
मनुक्यांमध्ये आहारातील फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात जे पोटासाठी चांगले असते. मनुक्यांचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिण्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
पचन
जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या असतील, तर तुम्ही मनुक्यांचे पाणी घेऊ शकता. मनुके आपल्या पोटातील अॅसिड नियंत्रित ठेवण्याचे काम करते. मनुकांमध्ये फायबर गुणधर्म असतात, जे पचनासाठी चांगले मानले जातात. सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाण्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या टाळता येते.
अशक्तपणा
मनुकांमध्ये कॅल्शिअम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म आढळतात. जे शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत करू शकतात. अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाण्याचे सेवन करू शकता.
हाड
मनुका कॅल्शियमचा चांगला स्रोत मानला जातो. कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. दररोज सकाळी भिजवलेल्या मनुका पाण्याचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते.