samosa
समोसा या पदार्थाचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. आता सामोश्याची पोहच संपूर्ण जगभर पसरली आहे. केवळ भारतातच नाही आता देशांतही सामोसा आवडीने खाल्ला जातो. मैदा आणि बटाटयाच्या स्टफिंगपासून बनवला जाणारा समोर सॉस किंवा पुदिन्याचा चटणीसोबत खाल्ला जातो. असा मुलाचं कोणी असेल ज्याला सामोसा खायला आवडत नाही. मात्र तुम्हाला माहित आहे का? भारतात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आणि भारताचा फेमस फूड म्हणून जगप्रसिद्ध असलेला सामोसा हा पदार्थ मूळ भारताचा नसून दुसऱ्याच देशाचा खाद्यपदार्थ आहे.
होय, हे खरे आहे. सामोसाची सुरुवात मूळ इराण या देशातून झाली होती. इरानमध्ये याला संबुश्क असे म्हणतात. याचा उल्लेख सर्वात आधी इतिहासकार अबुल फजल बेहकी यांनी ११ व्या शतकात केला.
भारतात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या सामोशाची कहाणीदेखील तितकीच रंजक आहे. इराणकडून भारतात व्यापार करायला येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हा सामोसा भारतात आल्याचे सांगितले जाते. भारतात बहुतेक जागी सामोसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पदार्थाला बिहार आणि बंगालमध्ये सिंघाडा म्हणून ओळखले जाते. आज सामोसा त्रिकोणी आकाराचा दिसतो मात्र पूर्वी असे नव्हते, परदेशातून भारतात आलेल्या सामोशाचे भारतीयकरण झाले.
सध्या भारतात बटाटयाची स्टँफिंग भरून सामोसा तयार केला जातो आणि खाल्ला जातो. मात्र परदेशातून आलेल्या या सामोशात पूर्वी बटाट्याची स्टफिंग न टाकता त्यावेळी खिमा आणि माव्याची स्टफिंग टाकली जायची. मात्र याचा आकार त्रिकोणी कसा झाला याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
पूर्वी मटणाचा खिमा यात टाकला जायचा मात्र आता याची जागा बटाटा आणि इतर पालेभाज्यांनी घेतली आहे. यात इतर मसाल्यांचाही वापर केला जातो. सामोसा या पदार्थात बटाटा टाकण्याची प्रथा पोर्तुगीजांच्या काळापासून सुरु झाली.
मात्र आता काळ बदलला, आता फक्त बटाट्याचेच नाही तर अनेक प्रकारचे सामोसे देशात उपलब्ध आहेत. यात पंजाबी आणि किमा, चीज, मशरूम, फूल गोबी, चॉकलेट, कांदा, चिकन पनीर समोसा, मॅकरोनी सामोसा, चाऊमीन सामोसा अशांचा समावेश आहे. सामोसा कुठूनही आला असला तरी आता तो भारताचा लोकप्रिय पदार्थ म्हणून जगप्रसिद्ध आहे.