
झटपट रेसिपी
पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत अधिकतर काहीतरी गरमा गरम खाण्याची इच्छा होत असते. पावसाळ्याच्या थंड वातावरणात कुरकुरीत भजी म्हणजे स्वर्गसुखच! भजी अनेक प्रकारे बनवली जातात. आज आम्ही तुम्हाला मूगडाळीपासून कुरकुरीत आणि स्वादिष्ट भजी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी फार सोपी असून अगदी कमी वेळेत बनवून तयार होते. मुगडाळ आरोग्यासाठी फार पौष्टिक असते. आजची ही रेसिपी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.