Gulgule Recipe : गुलगुले हा पदार्थ प्रामुख्याने गव्हाचे आणि गुळ घालून तयार केला जातो. चहासोबत याची चव अप्रतिम लागते. तुम्ही देवाच्या प्रसादासाठीही हा हलका गोड, बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असा पदार्थ तयार करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गुलगुले हा पारंपारिक हलका गोड, मऊ आणि बाहेरुन हलका कुरकुरीत असणारा पदार्थ आहे.
देवाच्या प्रसादासाठी किंवा चहासोबत नाश्ता म्हणून हा पदार्थ परफेक्ट ठरतो.
चला स्टेप बाय स्टेप याची रेसिपी जाणून घेऊया.
गुलगुले हा महाराष्ट्रातील पारंपरिक गोड पदार्थ असून घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून तो सहज तयार करता येतो. गूळ, गव्हाचे पीठ आणि थोडेसे तूप किंवा तेल यांचा वापर करून बनवलेले हे गोड गोळे बाहेरून किंचित कुरकुरीत आणि आतून मऊसर लागतात. चहासोबतचा नाश्ता, सण-समारंभ किंवा अचानक काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तरी गुळगुळे हा सोपा आणि झटपट पर्याय ठरतो. फार पूर्वीपासून खास प्रसंगी गुलगुले बनवण्याची परंपरा पाळली जात आहे. अशात सणांच्या या महिन्यात घरी झटपट असा गोड पदार्थ तयार करण्यासाठी तुम्ही या पदार्थाची निवास करू शकता. चला तर मग, घरच्या घरी मऊ आणि स्वादिष्ट गुलगुले कसे बनवायचे याची सोपी रेसिपीजाणून घेऊया.
एका भांड्यात गूळ घ्या. त्यात अर्धा कप कोमट पाणी घालून गूळ पूर्णपणे विरघळवून घ्या. गुळात माती किंवा अशुद्धता असल्यास मिश्रण गाळून घ्या.
एका मोठ्या भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, वेलची पूड, बडीशेप, मीठ आणि तूप घाला. त्यात गुळाचे पाणी थोडे थोडे घालत मऊसर पीठ मळून घ्या.
मळलेले पीठ झाकून साधारण 15 ते 20 मिनिटे ठेवून द्या. यामुळे रवा आणि पीठ व्यवस्थित फुगते आणि गुलगुले आतून मऊ होतात.
पीठाचे छोटे गोळे करून हाताला थोडे पाणी किंवा तेल लावून ते हलकेच चपटे करा. गुलगुले फार पातळ करू नका, अन्यथा ते कडक होऊ शकतात.
कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर एक छोटासा पीठाचा तुकडा तेलात सोडून पाहा. तो हळूहळू वर आला तर तेल योग्य तापमानाला आले आहे.
कढईच्या आकारानुसार काही गुलगुले तेलात सोडा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि छान फुगलेले होईपर्यंत तळा. आच खूप मोठी ठेवू नका, कारण बाहेरून पटकन रंग येऊन आतून कच्चे राहू शकतात.
तळलेले गुलगुले टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निघू द्या. त्यानंतर तयार गुलगुले चहासोबत किंवा स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी सर्व्ह करा.
Web Title: Ganeshotsav 2026 know how to make gulgule at home recipe in marathi