Kunafa Modak Recipe : कुनाफा चाॅकलेट तर तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण कुनाफ मोदक? या पदार्थाचा कधी तुम्ही विचारही केला नसावा पण गणेशोत्सवाच्या या सणानिमित्त ही रेसिपी एकदा नक्की करुन पाहा.
कुनाफा मोदक' रेसिपी
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गणेशोत्सवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मोदक ही गणपतीच्या आवडीची डिश आहे.
यंदा तुम्ही ट्रेंडी आणि फ्यूजन मोदकाची रेसिपी ट्राय करु शकता.
गणेशोत्सवात दरवर्षी उकडीचे मोदक, तळलेले मोदक किंवा नारळ-साखरेचे मोदक बनवले जातात. मात्र यंदा पारंपरिक चवीसोबत काहीतरी नवीन आणि आधुनिक करून पाहायचे असेल, तर दुबई स्टाईल कुनाफा मोदक नक्कीच करून पाहता येईल. दुबई चॉकलेटपासून प्रेरित असलेल्या या मोदकामध्ये कुरकुरीत कुनाफा, पिस्ता आणि चॉकलेट यांचे अप्रतिम मिश्रण केले जाते. गणपतीच्या नैवेद्यासाठी काहीतरी हटके बनवायचे असेल किंवा पाहुण्यांना नवीन प्रकारची मिठाई खाऊ घालायची असेल, तर ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते. चला तर मग पाहूया हा स्वादिष्ट कुनाफा मोदक घरच्या घरी कसे तयार करायचे याची रेसिपी नोट करुन घेऊयात.
सर्वप्रथम कुनाफा बारीक चिरून घ्या. कढईत बटर गरम करून त्यात कुनाफा घाला. मंद आचेवर सतत हलवत तो सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. गॅस बंद करून तो पूर्णपणे थंड होऊ द्या.
चॉकलेट वितळवून घ्या. भाजलेल्या कुनाफ्यामध्ये वितळलेले चॉकलेट घालून व्यवस्थित मिसळा. मिश्रणात चॉकलेटचा प्रत्येक भाग हलका कोट होईल याची काळजी घ्या.
एका भांड्यात पिस्ता पेस्ट, मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि चिरलेला पिस्ता घाला. सर्व साहित्य एकत्र करून घट्ट आणि क्रीमी मिश्रण तयार करा. मिश्रण खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
मोदकाच्या साच्याला आतून हलका बटर किंवा तेलाचा हात लावा. त्यानंतर चॉकलेट-कुनाफ्याचे मिश्रण साच्यात भरून त्याच्या बाजूला आणि तळाशी व्यवस्थित दाबून एक थर तयार करा. मधोमध पिस्त्याचे फिलिंग भरा.
पिस्त्याच्या फिलिंगवर पुन्हा चॉकलेट-कुनाफ्याचे मिश्रण घालून ते घट्ट दाबा. फिलिंग बाहेर येणार नाही आणि मोदक व्यवस्थित बंद होईल याची काळजी घ्या.
साचा बंद करून तयार मोदक फ्रिजमध्ये साधारण 20 ते 30 मिनिटे ठेवा. मोदक सेट झाल्यानंतर सावधपणे साचा उघडा आणि मोदक बाहेर काढा.
तयार मोदकावर थोडे वितळलेले चॉकलेट, बारीक चिरलेला पिस्ता किंवा ड्राय रोझ पेटल्स घालून सजवा.
चॉकलेट पूर्णपणे सेट झाल्यावर हा कुरकुरीत आणि क्रीमी कुनाफा मोदक नैवेद्यासाठी किंवा डेझर्ट म्हणून सर्व्ह करा.
Web Title: Ganeshotsav 2026 make trendy kunafa modak at home note down the recipe in marathi