कान्हाच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा माखन मिश्री, कान्हाला आवडणारा खास प्रसाद
Janmashtami Recipe: श्रावण महिना सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. याच महिन्यात खूप जास्त सणसमारंभ असतात. श्रावणात वातावरणात सुद्धा गारवा असतो. सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गोकुळाष्टमी. संपूर्ण राज्यभरात गोकुळाष्टमी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी घरामध्ये श्री कृष्णची पूजा करून गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. श्रीकृष्णाला लोणी खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे नैवेद्यामध्ये माखन मिश्रीचा नैवेद्य आवर्जून बनवला जातो. पण कामाच्या घाईमध्ये तूप किंवा लोणी बनवायला जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही तुपाचा वापर करून झटपट माखन मिश्री बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली माखन मिश्री चवीला अतिशय सुंदर लागते आणि १५ ते २० मिनिटांमध्ये झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया श्री कृष्णासाठी माखन मिश्री बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






