महिनाभरात होईल केसांची झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या 'हा' हिरवा ज्यूस, केस होतील सुंदर
Hair Care Tips: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांच्या आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. केस कोरडे पडणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा, टाळूवर इन्फेक्शन, केस पांढरे होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. बऱ्याचदा केस धुतल्यानंतर खूप जास्त गळू लागतात. केसांमधून कंगवा फिरवल्यानंतर खूप जास्त केस तुटून येतात. खूप जास्त प्रमाणात केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर टक्कल पडेल की काय अशी भीती मनात कायमच निर्माण होते. त्यामुळे केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर केअरचा वापर केला जातो. केस पांढरे होण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेले महागडे हेअर डाय किंवा हेअर कलर लावला जातो.(फोटो सौजन्य – istock)
केसांसंबधित समस्या वाढू लागल्यानंतर कायमच दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे केसांच्या समस्या वाढल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. केसांना वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी तुम्ही हा हिरवा ज्यूस बनवून पिऊ शकता. या ज्यूसचे सेवन केल्यामुळे केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते आणि केस सुंदर, चमकदार दिसतात. चला तर जाणून घेऊया केसांसाठी हिरवा ज्यूस बनवण्याची सोपी कृती.
केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये कोंडा वाढणे इत्यादी समस्या वाढू लागतात. त्यामुळे केसांना आतून पोषण देण्यासाठी हिरवा ज्यूस प्यावा. हा ज्यूस बनवण्यासाठी आवळा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर आवळ्याचे बारीक तुकडे करा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आवळ्याचा रस, काळे मीठ, कढीपत्त्याची पाने घालून त्यात अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तयार केलेला रस गाळून घ्या. तयार केलेला ज्यूस सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आवळ्याचा रस प्यायल्यास केसांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!
केस खूप जास्त गळण्यास सुरुवात झाल्यास विटामिन डी, कॅल्शियम, लोह इत्यादी वेगवेगळे सप्लिमेंट्स घेतले जातात. पण वारंवार सप्लिमेंट्सचे सेवन केल्यास किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतात. त्यामुळे आहारात आवळा आणि कढीपत्त्याच्या पानांचे सेवन करावे. आवळ्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. कढीपत्त्याची पाने केसांना भरपूर पोषण देतात. कढीपत्त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. यामध्ये असलेले विटामिन ए, बी, सी, ई आणि लोह भरपूर प्रमाणात असते.
Ans: पालक, काकडी आणि कोथिंबीर यांचा ज्यूस संतुलित आहाराचा भाग म्हणून घेऊ शकता. आवडीनुसार त्यात आवळा घालता येतो.
Ans: केसांची वाढ व्यक्तीनुसार बदलते. साधारणपणे केस महिन्याला सुमारे १ ते १.२५ सेंटीमीटर वाढतात. केवळ हिरवा ज्यूस प्यायल्याने एका महिन्यात केसांची वाढ वेगाने होईल, याची खात्री देता येत नाही.
Ans: पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमधून फोलेट, जीवनसत्त्वे आणि लोह यांसारखे पोषक घटक मिळतात. शरीरातील पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्या मदत करू शकतात.






