
पावसाळ्यात अशा पद्धतीने घ्या केसांची काळजी
वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसून येतो. काही दिवसांआधी राज्यभरात मुसळधार पाऊस पडला पण मागील काही दिवसांपासून पाऊस न पडता सगळीकडे कडक ऊन पडत आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. या बदलांमुळे केस गळती, आरोग्य बिघडणे, त्वचा कोरडी आणि तेलकट होणे, उन्हामुळे त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच केसांची देखील काळजी घेतली पाहिजे.
हवामानातील बदलांमुळे सर्दी, खोकला जाणवू लागतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळती सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केस जाण्यास सुरुवात होते. महिलांचे सौंदर्य केसांमुळे अधिक उठून दिसते. पण सतत होणाऱ्या केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती असते. त्यामुळे त्यामुळे वातावरणात बदल झाल्यानंतर योग्य प्रकारे केसांची कशी काळजी घ्यावी, याबद्दल काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या नक्की फॉलो करून पाहा.(फोटो सौजन्य-istock )
सर्व ऋतूंमध्ये केस स्वच्छ करण्यासाठी कमी प्रमाणात शॅम्पूचा वापर करावा. जास्त प्रमाणात शॅम्पू वापरल्याने केस गळू लागतात. कमी प्रमाणात शॅम्पू आणि कडींशनर लावल्याने केस गळती थांबेल.
अनेकदा काही मुली केस विंचरताना घट्ट केस बांधतात. यामुळे केसांची मूळ ओढली जातात. केसांची मूळ ओढली गेल्यामुळे केस गळती वाढून टक्कल पडण्याची भीती असते.
योग्य प्रकारे केसांची निगा राखल्यास केस गळती होत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना व्यवस्थित तेल लावून हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे केस तुटणार नाही. केसांना मसाज केल्याने रक्तभिसरण होते.
केसांच्या मुळांना पोषण देणे फार आवश्यक आहे. त्यासाठी योग्य तो आहार घेऊन केसांच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. केस स्वच्छ असल्यास केसामध्ये कोंडा होत नाही. केसांची मूळ मजबूत राहून केस घनदाट दिसतात. चमकदार केसांसाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना व्यवस्थित तेल लावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.