High cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावे?
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
High cholesterol: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, झोपेची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणाऱ्या हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचे सेवन करावे. हल्ली हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हार्ट अटॅक आणि हृद्यासंबंधित आजार खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे दिसून येतात. खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण कालांतराने समस्या आणखीनच गंभीर होतात आणि शरीराला हानी पोहचवतात.
खराब कोलेस्ट्रॉल जमा झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. धमन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा झाल्यामुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात. व्यवस्थित रक्तभिसरण न झाल्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला खराब कोलेस्ट्रॉपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
दैनंदिन आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. ओट्स, जव, बीन्स, डाळी आणि छोले चणे, सफरचंद, संत्री आणि नाशपती इत्यादी फळांचा समावेश करावा. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात करण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आहारात ऑलिव्ह ऑईल, मोहरीचे तेल किंवा शेंगदाणा तेलाचा कमीत कमी प्रमाणात समावेश करावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेल यांसारख्या माशांचा समावेश करावा. हे मशे शरीराला आवश्यक पोषण देतात.
शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
आहारात सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असलेल्या पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ गोळ्या औषधांचे सेवन नाहीतर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ खावेत. तेल-बटर, तूप, क्रीम, प्रक्रिया केलेले मांस, बेकरी पदार्थ आणि तळलेले फास्ट फूड कमीत कमी प्रमाणात खावे. सॅच्युरेटेड फॅट किंवा ट्रान्स फॅटचे प्रमाण वाढल्यानंतर अनसॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांची निवड करावी. अॅव्होकॅडो आणि ऑलिव्ह हे पदार्थ शरीराला पोषण देतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केवळ आहारात बदल करून चालणार नाहीत. नियमित व्यायाम, शारीरिक हालचाली, धूम्रपान करणे कमी करावे.
Ans: खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL (Low-Density Lipoprotein). याचे प्रमाण रक्तात वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीयुक्त थर जमा होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
Ans: ओट्स, जवस, डाळी, कडधान्ये, फळे, भाज्या, सुका मेवा आणि संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा. या पदार्थांमधील विद्राव्य फायबर आणि असंतृप्त चरबी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात.
Ans: होय. ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विद्राव्य फायबर असते. नियमितपणे योग्य प्रमाणात ओट्स खाल्ल्याने LDL कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते.






