Wockhardt Hospitals Mumbai (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) Wockhardt Hospitals Mumbai (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
या तंत्रज्ञानामध्ये उच्च दर्जाचे 3D दृश्य तंत्रज्ञान, मनगटाप्रमाणे लवचिक हालचाल करू शकणारी शस्त्रक्रियेची उपकरणे आणि सर्जनच्या नियंत्रणाखाली काम करणारे रोबोटिक हात यांचा समावेश आहे. यामुळे डॉक्टरांना शरीरातील गुंतागुंतीच्या भागांमध्ये लहान छेदांद्वारे अधिक अचूकपणे शस्त्रक्रिया करता येते. विशेष म्हणजे, रोबोट स्वतःहून शस्त्रक्रिया करत नाही. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्जनचेच प्रणालीवर नियंत्रण असते.
युरोलॉजी, स्त्रीरोगशास्त्र, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जरी आणि छातीशी संबंधित शस्त्रक्रिया अशा विविध वैद्यकीय क्षेत्रांमध्ये योग्य रुग्णांची निवड करून रोबोटिक सहाय्याने शस्त्रक्रिया करता येऊ शकते. शरीरातील अरुंद किंवा गुंतागुंतीच्या भागांपर्यंत पोहोचणे आणि ऊती हाताळताना अधिक अचूकता राखणे आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियांमध्ये हे तंत्रज्ञान विशेषतः उपयुक्त ठरू शकते.
योग्य रुग्णांमध्ये रोबोटिक सहाय्याने केल्या जाणाऱ्या कमीत कमी छेदांच्या शस्त्रक्रियेमुळे छेदांचा आकार लहान राहणे, रक्तस्राव कमी होणे, शस्त्रक्रियेनंतर वेदना कमी होणे आणि दैनंदिन कामांकडे लवकर परतता येणे असे संभाव्य फायदे मिळू शकतात. मात्र, रुग्णाची प्रकृती, शस्त्रक्रियेचा प्रकार आणि इतर वैयक्तिक घटकांनुसार बरे होण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो.
डॉ. वीरेंद्र चौहान, रिजनल बिझनेस हेड – इंडिया आणि ग्रुप हेड इंटरनॅशनल बिझनेस, वॉकहार्ट हॉस्पिटल्स, म्हणाले, “रोबोटिक सहाय्याने शस्त्रक्रिया करणे हा कमीत कमी छेदांच्या शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचा विकास आहे. Da Vinci X मुळे सर्जनना अधिक स्पष्ट दृश्य आणि अत्यंत लवचिक हालचाल करू शकणाऱ्या उपकरणांचा वापर करता येतो.
यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये अचूक हालचाली करण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान सर्जनच्या कौशल्याची जागा घेत नाही, तर त्यांच्या अचूकतेला आणि नियंत्रणाला अधिक बळ देते. कमीत कमी छेदांच्या शस्त्रक्रियेचा लाभ मिळू शकणाऱ्या रुग्णांसाठी या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
झहाबिया खोराकीवाला, व्यवस्थापकीय संचालक, वॉकहार्ट हॉस्पिटल्स, म्हणाल्या, “आरोग्यसेवा क्षेत्र अशा टप्प्यावर पोहोचले आहे, जिथे गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका दिवसेंदिवस महत्त्वाची होत आहे. वॉकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल येथे Da Vinci X दाखल करणे हे रुग्णांना आणि आमच्या वैद्यकीय पथकांना प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अनुभवी डॉक्टरांना आधुनिक तंत्रज्ञानाची साथ मिळावी, शस्त्रक्रियेच्या नव्या शक्यता निर्माण व्हाव्यात आणि रुग्णसेवा केंद्रस्थानी राहावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
Da Vinci X प्रणालीमुळे वॉकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रल येथील प्रगत शस्त्रक्रिया सुविधा आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवेच्या उपक्रमांना अधिक बळ मिळणार आहे. ही प्रणाली सर्जनना अधिक कुशलतेने आणि नियंत्रणासह शस्त्रक्रिया करण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आली असून, वैद्यकीयदृष्ट्या योग्य असलेल्या प्रक्रियांमध्ये कमीत कमी छेदांच्या शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध करून देते.






