पावसाळ्यात सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस पडून गेल्यानंतर सगळीकडे थंड वातावरण होते. पण या दिवसांमध्ये आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. रोगराई आणि साथीचे आजार वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या जाणवू लागतात. त्यातील सामान्यपणे जाणवणारी समस्या म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर खाली बसणे किंवा वर उठणे सुद्धा कठीण होऊन जाते. सांधेदुखीचा त्रास पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक जाणवतो. तसेच वातावरणात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे सांधेदुखीचा त्रास अधिक वाढू लागला आहे.
सांधेदुखीवर अनेक उपाय केल्यानंतर सुद्धा सांधेदुखीचा त्रास थांबत नाही. त्यामुळे सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावे. अनेकांना कमी वयातच सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. या आजारापासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरगुती उपाय केल्यास शरीरावर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत, हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
पावसाळ्यात सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
हे देखील वाचा: पावसाळ्यात खोकल्यापासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी ‘हे’ पदार्थ आहेत प्रभावी
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी तूप आणि ओवा प्रभावी आहे., तुपामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. तुपामध्ये विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई आणि विटामिन के यांसारखे अनेक पोषक घटक आढळून येतात. यामुळे सांध्यांना आलेली सूज कमी होते. तसेच सांध्यांमध्ये लवचिकता वाढते.
ओव्यामध्ये थायमॉल आढळून येते, जे शरीरातील जळजळ आणि सांध्यांची सूज कमी करण्यासाठी मदत करते. ओव्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आरोग्याला पोषण देतात. ओव्याचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते ज्यामुळे गुडघ्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते. हळदीचे सेवन केल्यामुळे शरीरातील खराब पेशी निघून जाण्यास मदत होते.
पावसाळ्यात सांधेदुखीवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय