daily today horoscope 13 march 2023 sagittarius rashi will get family support read your daily horoscope in marathi nrvb
व्यापाराच्या क्षेत्रात नवीन सुधारणा कराल तसेच नवीन संधीही प्राप्त होतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल व प्रशंसा करणाऱ्यांची संख्याही वाढेल. कार्यक्षेत्रात होणाऱ्या परिवर्तनाने तुमचे सहकारी नाराज होतील परंतु तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने वातावरण सकारात्मक बनवण्यात यशस्वी व्हाल. आप्तेष्टांकडून शुभवार्ता मिळेल ज्याने कुटुंबात सुख समृद्धी येईल.संध्याकाळचा वेळ परोपकारी कामात जाईल. पत्नीचे स्वास्थ्य बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल.
राजकारणाच्या क्षेत्रात प्रशंसकांच्या सहकार्याने यश मिळेल तसेच शासन व्यवस्थेकडूनही सहकार्य लाभेल. आपल्या वस्तूंची विशेष काळजी घ्या. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीची योजना बनवली जात आहे. बाहेरच्या खण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. प्रतिस्पर्धेच्या क्षेत्रात प्रगती कराल तसेच अडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होतील. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळेल. जोडीदाराशी असलेल्या नात्याला दुर्लक्षित करू नका तसेच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. संध्याकाळचा वेळ आप्तेष्टांसोबत आनंदात घालवाल.
आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगा. शत्रू तुमचे नुकसान व्हावे यासाठी प्रयत्न करू शकतात. विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी अधिक मेहनत करावी लागेल. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होऊ शकतो. दांपत्य जीवनात सुखद स्थिती राहील. वृद्धांची सेवा किंवा पुण्यकार्यासाठी पैसा खर्च झाल्याने मन आनंदी राहील. आज कुणालाही पैसे उधार देणे किंवा कर्जाऊ देणे टाळा.
कामाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर होतील तसेच समस्यांचे निवारण होईल. गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर पैसे खर्च होतील. तसेच संसारिक सुखोपभोगाच्या साधनात वाढ होईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती साधेल ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील. गौण कर्मचारी किंवा नातेवाईकांमुळे तणाव वाढेल. पैशांची देवाणघेवाण करताना सतर्क रहा अन्यथा पैसे अडकून राहू शकतात. कोर्टात ये-जा करावी लागेल परंतु यासंबंधात तुम्हाला यश मिळेल व तुमच्या विरोधातील सर्व षडयंत्र विफल ठरतील.
मोठ्या प्रमाणात धनलाभ होईल त्यामुळे कोशवृद्धी होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकाल. घराच्या सुशोभीकरणासाठी खरेदी करावी लागेल. व्यावसायिक योजनांना गती लाभेल तसेच तुमच्या अधिकारक्षेत्रातही वाढ होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. गरजू व्यक्तींना मदत केल्यास तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. सामाजिक तसेच सांस्कृतिक कामात रस घ्याल. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. संध्याकाळच्या वेळी देवदर्शनाचा लाभ मिळेल.
घरातील वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील व त्यांच्याकडून प्रेरणाही मिळेल. दुपारपर्यंत आंनदाची बातमीही मिळेल आणि नशिबाची साथ लाभेल. मुलांना समस्या सोडवण्यासाठी आपल्या वडिलांकडून मार्गदर्शन मिळेल. आपल्या आरोग्याची नीट काळजी घ्या. प्रेमजीवनात सुखद अनुभव येतील व समस्यांचे निराकरण होईल. कामामध्ये जोडीदाराची साथ मिळून समस्यांवर मात करता येईल. संध्याकाळच्या वेळी पाहुणे येऊ शकतात तसेच त्यांच्यासोबत एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याची संधीही मिळू शकते.
राजकारणाशी संबंधित व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात योग्य वेळी घेतले गेलेले निर्णय योग्य ठरतील तसेच अनुभवातून लाभ मिळेल. वडील व सहकारी यांच्या सहयोगाने एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती प्राप्त होईल. रोजगाराच्या क्षेत्रात यशप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे त्यामुळे आपले कार्य पुढे असेच चालू ठेवा. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना लाभ होईल. नव्या कामाच्या सुरुवातीसाठी मोठ्या व्यक्तींकडून समर्थन लाभेल त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल तसेच जोडीदाराकडून मदतही मिळेल. संध्याकाळच्या वेळी वाहन चालवताना काळजी घ्या.
विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धाक्षेत्रात खास संधी मिळण्याचा योग बनत आहे. उत्पन्नाची नवीन साधने मिळतील तसेच सर्व योजना पूर्ण होतील. सासरच्या संबंधात सुधारणा होतील. कामाच्या ठिकाणी संभाषण कला तुम्हाला विशेष सन्मान मिळवून देईल. जोडीदाराची सोबत व सान्निध्य पर्याप्त प्रमाणात मिळेल. नकोसा प्रवास करावा लागू शकतो. बेरोजगार व्यक्तींना रोजगारप्राप्ती होऊ शकते. अपत्यासंदर्भात चांगली बातमी मिळू शकेल. प्रवासाची स्थिती लाभदायक व सुखद राहील.
भागीदारीच्या कामात सावधानी बाळगा अन्यथा अपयशाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर करू शकाल. भावाच्या मदतीने अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल व यशकीर्तित वाढ होईल. कामाच्या ठिकाणी जिभेवर ताबा न ठेवल्यास विपरीत परिणामांचा सामना करावा लागू शकतो. प्रेमजीवनात एक नवी सुरुवात होईल तसेच नातेसंबंध दृढ होतील. नव्या कामाच्या सुरुवातीसाठी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या मदतीने तुमची कामे पूर्ण होतील. प्रियजनांच्या भेटीत किंवा फिरण्यात संध्याकाळचा वेळ घालवाल.
विद्यार्थ्यांना स्पर्धापरिक्षेत यश मिळेल तसेच त्यांना कुटुंबासंबंधीच्या जबाबदाऱ्या पार पाडता येतील. व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या मनाप्रमाणे लाभ मिळाल्याने आंनद होईल तसेच व्यवसायात परिवर्तन करण्याच्या योजनाही बनतील. कौटुंबिक खर्चात वाढ होईल परंतु जोडीदाराची सोबत मानसिक शांतता प्रदान करेल. वाहन चालवताना सावधानी बाळगा कारण त्याच्या अचानक खराब होण्याने खर्चात वाढ होऊ शकते. संध्याकाळच्या वेळी एखाद्या तीर्थस्थानाला भेट देण्याची योजना बनून ती आयत्यावेळी फसूही शकते. राजकारणाच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल तसेच नवीन संधीही प्राप्त होतील.
व्यावसायिक योजनांना बळ मिळेल तसेच विरोधकांची हार होईल. मनोरंजनाच्या संधी मिळतील. आर्थिक दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न सार्थक होतील. तसेच बेरोजगार व्यक्तींना रोजगारप्राप्ती होऊ शकते. लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. धावपळ किंवा अधिक खर्च करावा लागू शकतो. भविष्यासाठी काही बचत योजनांमध्ये गुंतवणूक कराल. विद्यार्थ्यांच्या आर्थिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल व पराक्रमातही वृद्धी होईल. मित्रांच्या मदतीने केलेल्या कामात यश मिळेल.
गुरूंच्या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या समरणशक्तीत वाढ होईल. कौटुंबिक वातावरणात गोडवा राहील. मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कौटुंबिक संपत्ती संबंधी वाद मिटतील. आज काही कारणाने जवळच्या किंवा दूरच्या ठिकाणी प्रवासाला जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. बिझनेसमध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे आनंदी राहाल तसेच मानसिक शांतीही लाभेल. आई-वडिलांचा आशीर्वाद आणि सल्ला दोन्ही उपयुक्त ठरतील. संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरताना महत्वाची माहिती मिळू शकेल.