health tips
मासिक पाळी ही महिलांसाठीची सामान्य समस्या आहे. प्रत्येक महिन्यात महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे मासिक पाळी दरम्यान शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. याकाळात अनेक स्त्रियांना चेहऱ्याच्या समस्या उद्भवत असतात. मासिक पाळीदरम्यान त्वचेच्या आरोग्यावर खूप परिणाम होत असतो. म्हणूनच या काळात आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठीच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
मासिक पाळीदरम्यान होणारे बदल
मासिक पाळीदरम्यान स्त्रियांच्या त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. हे बदल मुख्यतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स कमी झाल्यामुळे घडत असतात. म्हणूनच या काळात त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. याकाळात स्त्रियांमध्ये अनेक बदल होत असतात, हे बदल मासिक पाळीच्या चक्रामुळे होत असतात, त्यामुळे हे बदल फार सामान्य आहेत. या दिवसांत सूज येणे, मूड अशी लक्षणे पाहायला मिळतात. या काळात हार्मोन्समध्ये बदल होऊ लागतात, जे त्वचेवर परिणाम करतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यासार, मासिक पाळीमध्ये एकूण चार टप्पे असतात. पहिला टप्पा असतो, फॉलिक्युलर टप्पा- यात पहिल्या दिवसापासून तेराव्या दिवसांचा समावेश असतो. दुसरा टप्पा असतो, ओव्हुलेशन टप्पा- यात 14-16 दिवसांचा समावेश असतो. तिसरा टप्पा असतो, ल्यूटियल टप्पा- यात 17-24 दिवसांचा समावेश असतो आणि चौथा टप्पा असतो, फॉलिक्युलर फेज – यात पहिल्या 13 दिवसांचा समावेश असतो. या काळात इस्ट्रोजेन हार्मोनमध्ये हळूहळू वाढ होऊ लागते. त्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते, कारण इस्ट्रोजन हार्मोन कमी प्रमाणात बाहेर पडतो. मात्र हळूहळू याची पातळी वाढू लागते आणि त्वचा कमी कोरडी दिसू लागते.
फॉलिक्युलर टप्पा- याकाळात जर तुमची त्वचा इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे अधिक कोरडी आणि निर्जीव वाटत असेल तर यावेळेस तुम्ही हायलुरोनिक ऍसिडचा वापर करू शकता.
ओव्हुलेशन टप्पा- याकाळात त्वचेचे आरोग्य चांगले असते त्यामुळे यावेळी त्वचेची सामान्य काळजी घ्यावी. यासाठी मॉइश्चराइझर, क्लिंझर आणि सनस्क्रीनचा वापर करावा.
ल्यूटियल टप्पा- याकाळात त्वचा बऱ्यापैकी तेलकट पडते. त्यामुळे यासाठी सॅलिसिलिक ॲसिडसारख्या तेल कमी करणाऱ्या उत्पादनांचा वापर करावा. त्वचेला मॉइश्चराइझ करत राहावे.
फॉलिक्युलर फेज – याकाळात पुरळ येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यावेळी सॅलिसिलिक ॲसिड, टी ट्री ऑइल या गोष्टींचा वापर करावा. तसेच तुमच्या त्वचेला सतत मॉइश्चराइझ करत राहावे.