फोटो सौजन्य - Social media
भारत देश जगभरात येथील खाद्य संस्कृतीसाठी सुप्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यपदार्थांना जगभरात मोठ्या चवीनं खाल्ले जाते. याला सगळ्यात मोठे श्रेय भारतीय मसाल्यांचे आहे. भारतात तसेच सगळ्या दक्षिण आशियाई देशांमध्ये जेवणात विविध प्रकारचे मसाले टाकल्याशिवाय जेवण बनत नाही. भारतीय जेवणाची शान येथील निरनिराळे मसाले वाढवतात.
भारतात अनेक प्रकारचे मसाले तयार केले जातात. बाजारात आंतरराष्ट्रीय स्तरावर या मसाल्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. सगळ्यांत महत्वाचे म्हणजे बाजारात भारतीय मसाल्यांचे अनेक बनावटी रूप विकले जातात. ज्यातील काही प्रोडक्ट्स नक्कीच चवीला मसाल्यांशी मेल धरत असतील, परंतु अशा बनावटी मसाल्यांना खाल्याने शरीर आरोग्याच्या विविध समस्यांना नक्कीच बळी पडेल.
हे देखील वाचा : ना बॉसची कटकट, ना कामाचा व्याप; करा ‘ही’ नोकरी, मिळवा ३० कोटींचा पॅकेज
भारतातील हिंग या खडा मसाल्याचे अनेक बनावटी रूप बाजारात विकल्या जातात. हे बनावटी हिंग, चवीला जरी हिंगासारखे असले तरी अनेक प्रक्रियांद्वारे त्यांना बनवले जाते. या रासायनिक प्रक्रियांमध्ये रसायनयुक्त हिंग तयार होते, ज्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी गंभीर विकाराला आमंत्रण ठरू शकते. या बनावटी हिंगाला ओळखणे सोपे आहे. अशा अनेक पद्धती आहेत, ज्यांच्या मार्फत आपण घरच्या घरी हिंगाची चाचणी करू शकतो. या चाचणीद्वारे येणारा निकाल आपल्या आरोग्याला वाचवण्यास नक्कीच उपयुक्त ठरू शकतो.
हिंग असा मसाला ज्याचा सुगंध लवकर जात नाही. जर तुम्हाला असली आणि बनावटी हिंग यांच्यामधील फरक जाणूनच घ्यायचं आहे तर त्याचा सुगंध तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरू शकतो. त्यासाठी एक हिंग हातात घ्या. हातावर तो चांगलं चोळून घ्या. हाताला हिंगाचा सुगंध येऊ द्या. नंतर साबणाने स्वच्छ हात धुवा. जर हातावरील हिंगाचा सुगंध लवकर गेला म्हणजे हिंग बनावटी आहे. तर हात धुवूनही सुगंध टिकून राहिला तर हिंग असली असतो. त्याचबरोबर हिंगाच्या रंगावरून हिंगाची पारख करता येऊ शकते. हिंगाला पारखण्यासाठी एक हिंग घ्या. हिंग हा साधारणपणे भुऱ्या रंगाचा असतो. त्याला जरा चोळले तर याचा रंग लालसर होतो. जर अशी पद्धत करूनही तुमच्या हिंगाचा रंग लालसर झाला नाही तर समजून जा कि तुम्ही जो हिंग वापरत आहेत तो बनावटी आहे. त्यामुळे त्याला स्वयंपाकादरम्यान वापरणे टाळा.