नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही डाळ तांदूळ न भिजवता वाटीभर रव्यापासून बन डोसा बनवू शकता. हेल्दी आणि पौष्टिक चवीला बन डोसा लहान मुलांपासून घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. बन डोसा बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळ्या भाज्या सुद्धा टाकू शकता. यामुळे पदार्थ आणखीनच चविष्ट आणि खायला सुंदर लागेल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. अन्यथा थकवा, अशक्तपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. दक्षिण भारतात बनवले जाणारे पदार्थ आवडीने खातात. चला तर जाणून घेऊया बन डोसा बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी






