South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Homemade Sambar: इडली, डोसा किंवा गरमागरम वडा समोर आला की त्यासोबत सांबार नसेल तर मजाच येत नाही. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये सांबारला वेगळंच स्थान आहे. डाळ, ताज्या भाज्या आणि मसाल्यांचा योग्य वापर केल्यामुळे त्याची चव तर छान लागतेच, पण ते पोटभरीचंही असतं. विशेष म्हणजे सांबार बनवण्यासाठी फार काही अवघड करण्याची गरज नसते. काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी हॉटेलसारखं स्वादिष्ट सांबार तयार करता येतं.
भाज्या शिजल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ, सांबार मसाला, काश्मिरी तिखट आणि गुळाचा तुकडा मिसळा. हे मिश्रण काही मिनिटे उकळू द्या. चिंचेची आंबट चव आणि गुळाची हलकी गोडी सांबारला खास स्वाद देते. यानंतर शिजलेली डाळ नीट घोटून भाज्यांमध्ये मिसळा. सांबार जास्त घट्ट झालं असेल तर थोडं गरम पाणी घालून त्याला योग्य घट्टपणा द्या. आता मंद आचेवर सात-आठ मिनिटे सांबार उकळू द्या. या वेळेत मसाले आणि डाळीची चव व्यवस्थित एकत्र येते.
शेवटी फोडणी तयार करा. छोट्या कढईत तेल किंवा तूप गरम करून मोहरी आणि मेथीदाणे टाका. ते तडतडल्यावर हिंग, सुक्या मिरच्या आणि कढीपत्ता घाला. तयार फोडणी लगेच सांबारमध्ये ओता आणि पातेल्यावर दोन मिनिटे झाकण ठेवा. आता सुगंधी आणि झणझणीत सांबार तयार आहे. गरम इडली, डोसा, मेदू वडा किंवा साध्या भातासोबत ते वाढा. घरच्यांना ही चव नक्कीच आवडेल.






