लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
Ganeshotsav 2026: राज्यभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या आनंद आणि उत्साहात केले जाते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरात मोदकांचा नैवैद्य बनवला जातो. उकडीचे मोदक, रव्याचे मोदक, पुरणाचे मोदक इत्यादी वेगवेगळे मोदक बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला लाडक्या बाप्पासाठी गुलकंद मोदक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. गुलकंद मोदक आरतीनंतर प्रसादासाठी सुद्धा देऊ शकता. गुलकंद आणि सुका मेव्याचा वापर करून बनवलेला मोदक खाल्ल्यानंतर घरातील सगळेच तुमचं कौतुक करतील. नैवेद्याच्या थाळीमध्ये वेगवेगळे रंगीत मोदक ठेवायचे असल्यास तुम्ही या पद्धतीने चविष्ट गुलकंद मोदक बनवू शकता. हे मोदक दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






