उपवासाला बनवा हेल्दी टेस्टी राजगिऱ्याचे लाडू
श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून सगळीकडे ओळखला जातो. या महिन्यामध्ये नागपंचमी,नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी इत्यादी सण येतात. तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी अनेक महिला उपवास करतात. श्रावण महिन्यात केलेले उपवास आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे. सध्या सगळीकडे भक्तिमय वातावरण आहे. शंकर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला व्रत आणि उपवास करतात. उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे असिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू सोप्या पद्धतीमध्ये घरी कसे बनवायचे याची सोपी कृती सांगणार आहोत. हे लाडू खाल्ल्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
हे देखील वाचा: कच्च्या आंब्यापासून जेली बनवण्याची ‘ही’ रेसिपी मुलांना नक्कीच आवडेल