Soyabin Curry : सोयाबीनची भाजी आपल्या आरोग्यासाठी फायद्याची ठरु शकते, कारण यात प्रथिनांचा चांगला साठा आढळतो. घरी बनवली जाणारी सोयाबीनची भाजी खायला आवडत नसल्यास एकदा रेस्टाॅरंट स्टाईल ही रेसिपी ट्राय करा.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
सोयाबीनमध्ये प्रथिनांचा उत्तम साठा आढळतो.
तुम्हाला सोयाबीनची भाजी आवडत नसल्यास एकदा रेस्टाॅरंट स्टाईल ही भाजी नक्की बनवून खा.
ही भाजी थोडी वेळखाऊ असली तरी चवीला फार अप्रतिम लागते.
सोयाबीन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत असल्याने तो शाकाहारी आहारात महत्त्वाचे स्थान मिळवतो. मात्र अनेकांना घरी बनवलेली सोयाबीनची भाजी फारशी आवडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे योग्य मसाले, ग्रेव्ही आणि शिजवण्याची पद्धत. जर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मसालेदार आणि मखमली ग्रेव्हीसारखी सोयाबीन करी घरी बनवायची असेल, तर ही रेसिपीनक्की करून पाहा.
घरच्या घरी कमी वेळात आणि सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही ही रेस्टॉरंट स्टाईल सोयाबीन करी तयार करू शकता. पाहुणे आले असतील किंवा विकेंडला काही खास बनवायचे असेल, तर हा पदार्थ नक्कीच सर्वांच्या पसंतीस उतरेल.