
फोटो सौजन्य - Social Media
कुटूंबातील अनेक सदस्यांनी आपल्याला कधी ना कधी पालकची भाजी खाण्याचा सल्ला नक्कीच दिला असेल. फक्त कुटुंबाबातील सदस्यच नव्हे तर डॉक्टरही नेहमी पालकची भाजी आणि इतर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पालकाच्या भाजीमध्ये अनेक पोषणतत्व उपलब्ध असतात ज्याचा उपयोग आपल्या शरीरासाठी अपार असतो. पालकच्या भाजीमधील व्हिटॅमिन आणि इतर पोषकतत्वांच्या सेवनाने शरीरास खूप फायदे होतात. परंतु, बहुतेक लोकं अशी असतात ज्यांना हिरव्या भाज्या खाण्यास आवडत नाही. अशी लोकं हिरव्या भाज्या टाळल्याने अनेक पोषक घटकांपासून वंचित राहतात. हिरव्या भाज्या आवडत नसणारी लोकांसाठी एक पर्याय म्हणजे त्या भाज्यांचा स्वादिष्ट रस पिणे.
जर तुम्हालाही पालक भाजी खाण्यास रस नाही किंवा भाजीच आवडत नाही तर पालकाचे घरामध्ये तयार केलेले स्वादिष्ट रस तुम्हाला नक्कीच आवडेल. विशेष म्हणजे या रसात पालक भाजीसोबत पुदिना टाकला जातो, जे प्याल्याने शरीराला ताजगी मिळते. पालक आणि पुदिन्याचा रस हा वेट लॉससाठी अत्यंत उपयुक्त आहे. पालकात कमी कॅलरी असतात, परंतु त्यात भरपूर पोषणतत्वे, लोह, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन सी असतात. पुदिना हा शरीराला ताजेतवाने ठेवतो आणि पचन सुधारतो. कोथिंबीर आणि लिंबाचा रस शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात मदत करतात. जीरा पावडर पचन क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास सहकार्य करते. चला तर मग जाणून घेऊया पालक तसेच पुदिनीपासून रस बनवण्याची सोपी रेसिपी:
हे देखील वाचा : साखर तसेच मीठातील ‘हा’ घटक शरीराला धोकादायक; अनेक विकारांना देतो आमंत्रण
सामग्री :
एक मिक्सर ग्राइंडर घ्या आणि त्यात धुऊन ठेवलेले पालक, पुदिना आणि कोथिंबीर घाला. त्यात अर्धा कप पाणी टाका आणि मिक्सरमध्ये गुळगुळीत पेस्ट तयार होईपर्यंत वाटून घ्या. तयार झालेल्या मिश्रणात लिंबाचा रस, जीरा पावडर आणि आवश्यकतेनुसार मीठ घाला. रसाला थंडावा देण्यासाठी त्यात बर्फाचे तुकडे टाका आणि चांगले मिक्स करा. तयार केलेला रस गाळणीने गाळून घ्या जेणेकरून त्यातील तंतु आणि पानांचा कण बाहेर काढता येईल. ताजे आणि स्वादिष्ट पालक-पुदिना रस तयार आहे. हा रस नियमितपणे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत होईल. तर आजच हा पौष्टिक आणि ताजेतवाने पालक-पुदिना रस तयार करा आणि तुमच्या आहारात समाविष्ट करा.