नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची
सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात गोडाच्या पदार्थांसोबतच विविध पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. नैवेद्याच्या ताटात डाळभात, भाजी, चटणी, भरलेली मिरची, गोडाचे पदार्थ इत्यादी अनेक पदार्थ ठेवले जातात. त्यात आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे भरलेली हिरवी मिरची. कायमच बेसनच्या पिठाचा वापर करून मिरची तयार केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला बेसनाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने भरलेली मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली मिरची चवीला अतिशय सुंदर लागते. तसेच मिरची बनवताना पाण्याचा अजिबात वापर न केल्यास पदार्थ दोन ते तीन दिवस व्यवस्थित टिकून राहतो. भरलेली मिरची असेल तर भाजी बनवण्याची कोणतीही आवश्यकता नाही. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






