दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट रताळ्याचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ नेहमीच खाऊन कंटाळा येतो. नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही नाव हवं असत. पण सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकासाठी वेगवेगळे पदार्थ बनवण्याएवढा वेळ नसतो. त्यामुळे बाहेरून विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रताळ्याचे पॅनकेक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरतात. उपवासाच्या दिवशी रताळी आवर्जून खाल्ली जातात. यामध्ये विटामिन ए, सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला फायदे होतात. रताळ्यातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनक्रिया सुरळीत चालू राहण्यासाठी मदत होते. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी रताळ्याचे सेवन केल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळ्याचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी






