

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात वेगवेगळ्या उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. कारण थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि वारंवार आजारपण वाढते. त्यामुळे हिवाळ्यात दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. या दिवसांमध्ये सगळ्यांचं चायनीज खाण्याची खूप जास्त इच्छा होते. स्ट्रीट स्टाईल चायनीज खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पण नेहमीच विकतचे चायनीज खाण्यापेक्षा घरी तुम्ही व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल आणि शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. लहान मुलं भाज्या खाण्यास नकार देतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने बनवलेले सूप खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
कोथिंबीरच्या काड्या
कोबी
लसूण
आलं
कोथिंबीर
शिमला मिरची
कांद्याची पात
सोया सॉस
रेड चिली सॉस
शेजवान चटणी
टोमॅटो केचअप
कॉर्नफ्लोअर
काळीमिरी पावडर
मीठ
साखर
व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाज्या स्वच्छ धुवून मध्यम आकारात बारीक चिरून घ्या.
टोपात पाणी घेऊन त्यात कोथिंबीरच्या काड्या, कोबीची पाने, दुधीची सालं, गाजरच्या साली आणि चवीनुसार मीठ घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेलं आलं, लसूण घालून तेलात खमंग भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कांद्याची पात, गाजर, ढोबळी मिरची, कोबी, कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.
वाटीमध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, शेजवान चटणी, टोमॅटो केचअप घालून चमच्याने मिक्स करा. तयार केलेली पेस्ट सूपमध्ये घालून मिक्स करा.
सगळ्यात शेवटी भाज्यांचा स्टॉक आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा.
त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, कॉर्नफ्लोअर आणि साखर, पाण्याची पेस्ट घालून सूपमध्ये घालावी.
सूपला एक उकळी आल्यानंतर सूप दाटसर होईल आणि चव सुद्धा मस्त लागेल. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी टेस्टी व्हेजिटेबल स्टॉक मंचाव सूप.