Winter Food: शरीरातील प्रत्येक अवयव होईल तृप्त! हिवाळ्यात डाळ खिचडीसोबत आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

Winter Food: थंडीच्या दिवसांमध्ये डाळखिचडी आवर्जून खाल्ली जाते. पण पदार्थाची चव आणखीनच वाढवण्यासाठी लोणचं, पापड किंवा तूप जेवणात मिक्स करून खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात.
शरीरातील प्रत्येक अवयव होईल तृप्त! हिवाळ्यात डाळ खिचडीसोबत आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
शरीरातील प्रत्येक अवयव होईल तृप्त! हिवाळ्यात डाळ खिचडीसोबत आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
Published on: 
Updated on: 
  • थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता का असते?

  • डाळखिचडी शिवाय आहारात करा या पदार्थांचा समावेश?

  • थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्णतेची आवश्यकता का असते?

वातावरणात गारवा वाढायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उष्ण पदार्थांची फार आवश्यकता असते. त्यामुळेच आहारात गरम पदार्थ खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. अशावेळी रात्रीच्या जेवणात डाळभात आणि डाळखिचडी हे ठराविक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कारण गरमागरम डाळखिचडी आणि पापड असेल तर जेवणार चार घास जास्त जातात. डाळखिचडी पचनाला अतिशय हलकी असते, त्यामुळे कोणत्याही वेळी खाऊ शकता. हिवाळ्याच्या थंडीत शरीराला उब आणि समाधान देण्यासाठी वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचे सुद्धा सेवन केले जाते. चला तर जाणून घेऊया डाळखिचडीसोबत आहारात इतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? याबद्दल सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)

डाळखिचडीची रंगत वाढवण्यासाठी तूप:

गरमागरम आणि वाफाळत्या खिचडीवर भरपूर साजूक तूप टाकून खाल्ल्यास खिचडी खाण्याचा आनंद आणखीनच वाढतो. तूप शरीरासाठी गुणकारी आहे. त्यामुळे खिचडी बनवल्यानंतर त्यावर तूप टाकून खावे. यामुळे चव सुद्धा वाढते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. शरीरातील उष्णता आणि स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी तूप फायदेशीर मानले जाते. जेवणाच्या ताटात जर डाळ खिचडी किंवा वरणभातासोबत तूप नसेल तर जेवण अपूर्णच वाटते.

मुरलेले लिंबाचे लोणचे:

डाळखिचडीसोबत लिंबाचं लोणचं अतिशय चविष्ट लागत. आंबटगोड लिंबाचं लोणचं पदार्थाची चव वाढवण्यास मदत करते. मऊ आणि हलक्या चवीच्या खिचडीसोबत आंबट-गोड लिंबाचे लोणचे असेल तर चार घास जास्त जातात. प्रत्येक घरात वर्षानुवर्षे लिंबाचं लोणचं बनवण्याची परंपरा आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी अतिशय थोड्या प्रमाणात लोणचं खावे.

गरमागरम कढी:

दही, बेसन आणि झणझणीत मिरची लसूणची फोडणी देऊन बनवलेली आंबट तिखट कढी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. कढी आणि खिचडी हे बेत खूप खास असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यास गरमागरम डाळखिचडी आणि कढी बनवून खावी. कढीचा आंबट-गोड आणि खमंग स्वाद खिचडीच्या चवीला छान साथ देण्यास मदत करतो.

कुरकुरीतपणा आणणारे पापड:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पापड खायला खूप जास्त आवडतात. गरमागरम कुरकुरीत पापड आणि डाळखिचडी किंवा वरणभात असेल तर दोन घास जास्त जातात. उडीद डाळीचे पापड भाजून किंवा तळून खिचडीसोबत खायला चविष्ट लागतात. त्यामुळे जेवणात तुम्ही उडीद डाळ पापड, तांदळाचे पापड बनवून खाऊ शकता.