तरुणांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरची लक्षणे
सिनेनिर्माते आणि प्रसिद्ध अभिनेते कृष्ण कुमार यांची मुलगी तीशा हिचे कॅन्सर या गंभीर आजाराने निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून तीशा कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत होती. तिच्यावर जर्मनीमध्ये उपचार सुरु होते. पण अखेर तिची कर्करोगाशी असलेली झुंज अयशस्वी ठरली. तीशाने वयाच्या 21 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. तिच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील हळहळ व्यक्त केली आहे.(फोटो सौजन्य-istock)
कॅन्सर हा दुसरा गंभीर आजार आहे. मागील 10 वर्षांमध्ये तरुण मुलांमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देताना अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सर रुग्ण आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम अधिक घातक असतात. 10 वर्षांमध्ये कॅन्सरचे रुग्ण 25 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 20 अधिक असल्याचे, एका रिपोटरमध्ये सांगण्यात आले आहे. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे.
चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा कॅन्सर झाल्यानंतर लवकर लक्षणे ओळखून येत नाही. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर कॅन्सर झाल्याचे निदान होते. कॅन्सरवर वेळीच औषध उपचार केले नाहीत तर अनेकदा त्या व्यक्तीला आपला जीव देखील गमवावा लागतो. कॅन्सर या आजाराचे नाव घेतल्यानंतर सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. या आजाराचे उपचार महाग असल्याने काही लोक लक्षणे दिसू लागली तरीसुद्धा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 200 पेक्षा जास्त कॅन्सरचे प्रकार आहेत.
हे देखील वाचा: निर्माता कृष्णा कुमार यांची मुलगी तीशाचे २१ व्या वर्षी निधन, कर्करोगाशी देत होती झुंज!