how to reduce uric acid
युरिक अॅसिड हे एक असे रसायन आहे जे शरीरात प्युरीन नावाचे पदार्थ तुटल्यावर तयार होते. प्युरिन सामान्यतः शरीरात तयार होतात. याशिवाय प्युरिन काही खाद्यपदार्थ आणि पेयांमध्येही आढळतात. प्युरीनचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नामध्ये अँकोव्हीज, मॅकरेल, वाळलेल्या बीन्स आणि मटार आणि बिअर यांचा समावेश होतो.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या रक्तातील युरिक अॅसिड नियंत्रित करायचं असेल, तर तुमच्या आहाराची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही खाद्यपदार्थ आहेत ज्याद्वारे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. या लेखातून आम्ही तुम्हाला एका असा पेयाबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे शरीरातील उच्च युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी हा सोपा उपाय दिला आहे. (फोटो सौजन्य – iStock)
युरिक अॅसिडवर लिंबू कसे फायदेशीर?
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की 2 ताज्या लिंबाचा रस 2 लिटर पाण्यात मिसळून दररोज प्यायल्याने संधिवात होण्याचा धोका कमी होतो. हे रक्तातील युरिक अॅसिड कमी करते. वास्तविक, लिंबांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी आढळतात, जे शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी मदत करते. याच्या मदतीने युरिक अॅसिडचे प्रमाण लवकर कमी करता येते.
[read_also content=”शरीरात झपाट्याने वाढलेले Uric Acid करा ५ पद्धतीने कमी https://www.navarashtra.com/lifestyle/5-home-remedies-to-lower-down-high-uric-acid-effective-tips-541076.html”]
युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्यासाठी ड्रिंक
युरिक अॅसिड नियंत्रणात आणण्याासाठी तुम्ही लिंबू पाण्याचे नियमित सेवन करू शकता. यासाठी तुम्हाला पाण्यासह केवळ दोन पदार्थांची आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला याची रेसिपीदेखील इथे सांगत आहोत.
साहित्य
कृती
[read_also content=”रक्तातील जमलेले युरिक Acid कमी करण्यासाठी चावा ही ३ पानं https://www.navarashtra.com/lifestyle/these-three-leaves-are-very-effective-on-uric-acid-in-blood-nrak-286386.html”]
संदर्भ
https://www.medicalnewstoday.com/articles/lemon-juice-and-gout
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/31482168/