Peepal Tree Removal Tips: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
How to Remove a Peepal Tree Growing in Walls: बऱ्याच घरांमध्ये हा प्रॉब्लेम दिसतो. छतावर, भिंतीच्या भेगांमध्ये किंवा गच्चीच्या कोपऱ्यात अचानक पिंपळाचं छोटंसं रोप उगवतं. सुरुवातीला ते अगदी छोटं दिसतं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो की, छोटसं रोपटं आहे, सुकून जाईल आणि मरेल. पण हेच दुर्लक्ष नंतर महागात पडू शकतं. त्याची मुळं हळूहळू भिंतीच्या आत जातात आणि मग भिंतीला तडे जायला लागतात, पावसाचं पाणी घरात झिरपायला लागतं. Peepal Tree Removal Tips:
त्यामुळे ते वेळीच काढणं खूप गरजेचं आहे. पण ते कसं काढायचं? अनेकजण मीठ टाकून वाळवण्याचा उपाय सांगतात, तो योग्य आहे का? युट्युबवर ‘सुरेंद्र की दुनिया’ नावाने फेमस असलेल्या सुरेंद्र यांनी यावर एक सोपा घरगुती उपाय सांगितला आहे.
पिंपळाच्या बिया खूप हलक्या असतात. वाऱ्यामुळे किंवा पक्ष्यांच्या विष्ठेमधून त्या आपल्या घराच्या छतावर, भिंतीच्या फटीत येऊन पडतात. तिथे थोडी धूळ, माती आणि पावसाचं पाणी मिळालं की त्याला लगेच कोंब फुटतो. सुरुवातीला ते दोन पानांचं छोटं रोप असतं, पण त्याची वाढ खूप फास्ट होते. म्हणून छतावर कुठे हिरवं काही दिसलं तर लगेच लक्ष द्या.
पिंपळाची मुळं खूप मजबूत असतात. ती आधीच असलेल्या छोट्या भेगांमध्ये शिरतात आणि आत वाढत जातात. मुळं जाड झाली की भेगा अजून रुंद होतात. मग काय, भिंतीवर ओले डाग दिसायला लागतात, प्लास्टर निघायला लागतं आणि कधी कधी तर पावसाळ्यात भिंतीतून पाणीच यायला लागतं. जर तुमच्या भिंतीला ओलसरपणा वाटत असेल तर एकदा वर जाऊन नक्की चेक करा, कुठे झाड तर नाही ना उगवलं.
गावाकडे किंवा घरगुती उपायांमध्ये बरेच जण सांगतात की पिंपळावर मीठ टाका, आपोआप वाळून जाईल. मीठ टाकल्याने काय होतं, तर मातीतला खारटपणा वाढतो आणि मुळांना पाणी शोषता येत नाही, त्यामुळे झाड वाळतं.पण हा उपाय 100% यशस्वी नाहीच. कधी कधी मीठ टाकून पण झाड वाळत नाही, वरून वाळल्यासारखं दिसतं पण मुळं आत जिवंतच राहतात.
काय आहे Zero Salt Diet? महिनाभराने शरीरावर कसा होईल परिणाम
दुसरा मोठा तोटा म्हणजे जास्त मीठ टाकलं तर आजूबाजूची माती खराब होते. तिथे तुम्ही दुसरं कोणतंही झाड लावलं तर ते पण येणार नाही. भिंतीच्या आत एवढं मीठ टाकणं पण चांगलं नाही. म्हणून फक्त मीठ टाकण्याच्या भानगडीत पडू नका.
जर रोप अगदी छोटं असेल, म्हणजे अजून हाताने उपटता येईल एवढं, तर लगेच काढून टाका. मुळासकट निघेल याची काळजी घ्या. हातात ग्लोव्हज घाला आणि खुरप्याच्या मदतीने हलकेच काढा.पण जर झाड थोडं मोठं झालं असेल, त्याची मुळं भिंतीत खोल गेली असतील किंवा ते छताच्या कडेला अशा धोक्याच्या ठिकाणी उगवलं असेल जिथे तुम्हाला पोहोचता येत नाही, तर स्वतः काही करू नका. अशावेळी एखाद्या माळ्याला किंवा बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला बोलवा. ते योग्य प्रकारे ते काढून देतील.
झाड काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कामबऱ्याच जणांची चूक काय होते, झाड काढलं की झालं. पण तसं नाही. झाड काढल्यावर तिथे एक मोठी भेग तयार होते. त्या भेगेत माती, मुळांचे तुकडे आणि ओलावा राहतो. ती भेग तशीच ठेवली तर पावसाचं पाणी तिथून आत जाणारच.
म्हणून झाड काढल्यावर ती जागा व्यवस्थित साफ करा. तिथे सिमेंट आणि वॉटरप्रूफिंग केमिकल टाकून ती भेग पूर्णपणे बुजवून घ्या. तरच तुमची भिंत पुन्हा मजबूत होईल.
Health Tips: चवीच्या नादात जास्त मीठ खाताय? आरोग्यासाठी ठरू शकते …
छत आणि गच्ची नेहमी साफ ठेवा. पालापाचोळा, माती साचू देऊ नका. पाणी साचत असेल तर त्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करा. पावसाळ्याच्या आधी एकदा पूर्ण छत चेक करा, कुठे भेगा आहेत का, कुठे छोटं रोप आलंय का. वेळीच लक्ष दिलं तर मोठा खर्च वाचेल.थोडक्यात, पिंपळाचं झाड दिसलं की त्याला लहान समजून सोडू नका. वेळीच काढा आणि भिंतीची दुरुस्ती करून घ्या, नाहीतर नंतर घर कमकुवत व्हायला वेळ लागणार नाही.
Ans: वाऱ्याने किंवा पक्ष्यांमार्फत पिंपळाच्या बिया भिंतीच्या भेगांमध्ये पोहोचतात. तिथे माती, धूळ आणि पाणी मिळाल्यावर त्यांना कोंब फुटतो.
Ans: मिठामुळे झाड वाळू शकते; मात्र हा उपाय १००% प्रभावी नाही. जास्त मिठामुळे आजूबाजूची मातीही खराब होऊ शकते.
Ans: झाड काढल्यानंतर भेग स्वच्छ करून सिमेंट आणि वॉटरप्रूफिंगच्या मदतीने व्यवस्थित बुजवावी.






