साहित्य ● बीटरूट (किसलेले) अडीच वाटी ● खवा (किसलेले) एक वाटी ● मिल्क पावडर एक वाटी ● साखर एक वाटी ● वेलची पूड ● काजू बदाम पिस्ता एक वाटी कृती सर्वप्रथम लाडू बनवण्यासाठी सर्व प्रथम एका जाड तळाच्या पॅनमध्ये दोन कप पाणी गरम करावे. त्यात किसलेले बीटरूट, साखर, वेलची टाकावी. साखर वितळली की गॅस कमी करून शिजवा. ओलावा सुकल्यावर पॅन गॅसवरून खाली उतरवून ठेवा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. यानंतर भाजलेला खवा, मिल्क पावडर, काप केलेले ड्रायफ्रूट्स मिक्स करावे. या मिश्रणापासून हव्या त्या आकाराचे लाडू बनवाहे लाडू चवीला जेवढे टेस्टी आहेत तेवढेच ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट खायचा कंटाळा करणारे लोक सुद्धा हे लाडू चवीने खातील.