• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • If You Eat Too Much Of This These Organs Will Suffer

‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन

चुकीच्या आहारामुळे लिव्हर, हृदय, मेंदू, किडनी आणि गट हेल्थवर गंभीर परिणाम होत असल्याने साखर, मीठ, तेलकट अन्न आणि प्रोसेस्ड फूडचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 26, 2025 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गोड खाणाऱ्यांनीही सावध राहणे गरजेचे
  • इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्याने डायबिटीजचा धोका दुप्पट
  • प्रिझर्वेटिव्ह आणि रसायने यामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने गट हेल्थ बिघडते
बदलत्या जीवनशैलीत चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे अनेक अवयवांवर ताण वाढत असून गंभीर आजारांची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शरीराला ऊर्जा देणारे अन्नच अनेकदा आपल्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू ठरते, विशेषत: जेव्हा ते प्रमाणाबाहेर खाल्ले जाते. तज्ज्ञांच्या मते काही विशिष्ट पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचा थेट परिणाम महत्त्वाच्या अवयवांवर होतो आणि दीर्घकालीन नुकसानही होऊ शकते. मद्यपान हे यकृतासाठी सर्वात मोठे संकट मानले जाते. अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाल्यास फॅटी लिव्हर, सिरॉसिस आणि लिव्हर फेल्युअरसारखे गंभीर आजार उद्भवू शकतात, कारण लिव्हर हे शरीरातील सर्व विषारी घटक फिल्टर करण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते. त्याचप्रमाणे, जास्त तेलकट आणि फ्राईड अन्न सेवन केल्याने हृदयावर थेट घाव बसतो. अशा पदार्थांमुळे कोलेस्टेरॉल वाढते, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होऊ शकते आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. गोड खाणाऱ्यांनीही सावध राहणे गरजेचे आहे; अतिरिक्त साखरेमुळे मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे, मूड स्विंग्स वाढणे आणि ब्रेन इन्फ्लेमेशनची समस्या उद्भवू शकते. तसेच इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्याने डायबिटीजचा धोका दुप्पट होतो.

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना

जास्त मीठ सेवन करणाऱ्यांसाठीही धोक्याची घंटा वाजते. मीठाचे प्रमाण वाढल्यास रक्तदाब वाढतो आणि त्याचा थेट परिणाम मूत्रपिंडांवर होऊन किडनी डॅमेजची शक्यता निर्माण होते. त्वचेच्या समस्या भोगणाऱ्यांसाठी दूध व दुग्धजन्य पदार्थही कारणीभूत ठरू शकतात. काही व्यक्तींमध्ये मिल्क प्रोटिन्स आणि हॉर्मोन्समुळे पिंपल्स वाढणे, स्किन इन्फ्लेमेशन आणि ऍक्नेची समस्या निर्माण होते. आधुनिक जीवनशैलीत मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे प्रोसेस्ड व पॅकेज्ड फूड आतड्यांच्या आरोग्यासाठी मोठे घातक आहे. प्रिझर्वेटिव्ह आणि रसायने यामध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याने गट हेल्थ बिघडते, पचनशक्ती कमी होते आणि गट फ्लोरावर नकारात्मक परिणाम होतो. सोडा आणि कोल्ड ड्रिंक्समध्ये असलेली जास्त साखर आणि कृत्रिम घटक पॅनक्रियासवर ताण आणतात, ज्यामुळे इन्सुलिन उत्पादनाचा नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. एवढेच नव्हे तर, अल्कोहोल आणि तळकट पदार्थांची जोड घेतल्यास फुफ्फुसांवरही परिणाम होतो. इम्युनिटी कमी होणे, इन्फ्लेमेशन वाढणे आणि फुफ्फुसांची क्षमता कमी होणे यासारखे परिणाम दिसू शकतात.

वय वाढल्यानंतर शरीरासंबंधित अनेक समस्या उद्भवतात? मग सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘ही’ योगासने

तज्ज्ञांच्या मतानुसार निरोगी राहण्यासाठी अन्नाचे प्रमाण, गुणवत्ता आणि जीवनशैलीतील समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्यम प्रमाणात अन्न सेवन, ताजे व नैसर्गिक पदार्थांचा आहारात समावेश, व्यायाम, पुरेसे पाणी आणि प्रोसेस्ड तसेच जास्त साखर, मीठ व तळकट पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे स्वास्थ्य राखण्याचे सर्वात सोपे सूत्र मानले जाते. चुकीचा आहार हे अनेक आजारांचे मूळ असल्याने ‘काय खावे’ यापेक्षा ‘किती खावे’ हे ओळखणे आजच्या काळात जास्त आवश्यक झाले आहे.

Web Title: If you eat too much of this these organs will suffer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 04:15 AM

Topics:  

  • daily health
  • healthy tea

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीने पार केला 2,60,000 रुपयांचा टप्पा! जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीने पार केला 2,60,000 रुपयांचा टप्पा! जाणून घ्या सविस्तर

Jan 11, 2026 | 08:11 AM
Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Jan 11, 2026 | 08:09 AM
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा पारंपरिक लसूण पतीचा झणझणीत ठेचा, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

Jan 11, 2026 | 08:00 AM
Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

Hyderabad Crime: आईने 10 महिन्यांच्या बाळाला विष दिल, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य, सासूनेही उचलले टोकाचे पाऊल; काय नेमकं प्रकरण?

Jan 11, 2026 | 07:49 AM
Surya Nakshatra Parivartan: 11 जानेवारीपासून या राशींच्या जीवनात येणार सुवर्णकाळ, उत्पन्न आणि व्यवसायात होईल भरभराट

Surya Nakshatra Parivartan: 11 जानेवारीपासून या राशींच्या जीवनात येणार सुवर्णकाळ, उत्पन्न आणि व्यवसायात होईल भरभराट

Jan 11, 2026 | 07:05 AM
Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

Jan 11, 2026 | 06:15 AM
Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Jan 11, 2026 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Jan 10, 2026 | 08:13 PM
Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jan 10, 2026 | 08:09 PM
Maharashtra Politics :  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Jan 10, 2026 | 08:05 PM
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM
KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

KDMC News : निवडून आल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास –कुणाल पाटील

Jan 10, 2026 | 07:41 PM
Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Nagpur Crime: कारमध्ये बनवला होता खाचा, डिलिव्हरी पूर्वीच अडकले; ओडिशाचे ४ गांजा तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

Jan 10, 2026 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.