(फोटो सौजन्य – istock)
वाढत्या वयासोबत हे आजार आल्यामुळे अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही सांधेदुखीच्या त्रासापासून तुमची मुक्तता करू शकता. या असह्य वेदना कवटाळत बसण्याची गरज नाही तर फक्त आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे आणि आरोग्यदायी बदल करण्याची गरज आहे. चला सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करता येतील ते जाणून घेऊया.
उबदार कपडे
थंडीत शरीर उबदार ठेवावे, कारण या दिवसात तापमान कमी होते. ज्यामुळे सांध्यांमध्ये कडकपणा वाढतो. तुम्हाला वारंवार सांधेदुखीचा त्रास होत असेल तर जाड थर असलेले कपडे घालावेत. फरशीवर थेट बसू नये. यासाठी ब्लॅकेट, रजाई घ्यावी. हीटिंग पेंडचा वापर करावा. मोजे, कानटोपी, स्वेटर घालावे.
व्यायाम करा
थंडीत आळस आल्याने बरेचजण व्यायाम करणे टाळतात. पण यामुळे वेदना आणखी वाढू शकतात. जेव्हा शरीराची हालचाल होते तेव्हा रक्तप्रवाह सुधारतो आणि सांध्यातील कडकपणा कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी न चुकता हलके स्ट्रेचिंग आणि योगा करायला हवा.
सूर्यप्रकाश घ्या
सूर्यप्रकाश कमी असल्याने हिवाळ्यात ‘व्हिटॅमिन D कमतरता शरीरात निर्माण होते, जे सांधेदुखीला एक प्रमुख कारण ठरते. त्यामुळे शक्य असल्यास थोडा वेळ दररोज सौम्य सूर्यप्रकाशात बसा. व्हिटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे सांधेदुखी कमी होण्यास मदत मिळते.
बसण्याची स्थिती
साधेदुखी बसण्याच्या चुकीच्या स्थितीमुळे आणखीन वाढू शकते. त्यामुळे बसताना कुबड न काढता पाठ सरळ ठेवून बसावे, पाठीला आधार द्यावा. बसताना वारंवार स्थिती बदलणे आणि दर २० मिनिटांनी ब्रेक घेणे महत्त्वाचे आहे. क्रॉस-पाय घालून बसणे टाळावे, कारण त्यामुळे सांधेदुखी वाढू शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






