युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन
शरीर निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अनेक बदल होतात. सतत जंक फूडचे सेवन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीच्या सवयी बदलून निरोगी जगणे आवश्यक आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असणे आवश्यक आहे. तसेच शरीरात रक्तातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात असणे आवश्यक आहे. पण रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढल्यानंतर सांध्यांमध्ये आणि हातांच्या बोटांमध्ये क्रिस्टल्स तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हातापायांना सूज येते. शरीरात युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सांध्यांमध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवाताचा त्रास होण्यास सुरुवात होते. अशावेळी आहारात बदल करून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. युरिक ॲसिडची पातळी शरीरात वाढल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
शरीरात वाढलेली युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात कमी चरबी युक्त दुधाचे सेवन करावे. यामुळे युरिक ॲसिड कमी होऊन आराम मिळतो. शरीरात वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात घरगुती पदार्थांचे सेवन केल्यास अनेक आजार बरे होण्यास मदत होते. शिवाय यामुळे पायांच्या बोटांमधील वेदना कमी होतात.
युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन करावे. यासाठी कोमट पाणी करून त्यात ऍपल सायडर व्हिनेगर टाकून सेवन करावे. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. यामुळे तुमच्या शरीरात नसांमधून युरिक ॲसिड कमी होऊन बोटांमधील वेदना आणि सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चेरी हे फळं खायला खूप आवडते. चेरी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात चेरीचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चेरी खाल्ल्याने युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते. शिवाय आरोग्यासंबंधित इतर आजारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. चेरीचे सेवन केल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीराला पाण्याची आवश्यकता असते, मात्र शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य हळूहळू बिघडू लागते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. आहारामध्ये फळांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळेल. ओमेगा 3 फॅटी ॲसिड, फॉलिक ॲसिड आणि विटामिन सी सप्लिमेंट्स इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.