उपाशी पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा पोट आणि पचनावर कसा परिणाम होतो
कॉफी पिण्याची योग्य वेळ?
कॉफीचे सेवन करण्याचे फायदे आणि तोटे?
कोणत्या वेळी कॉफीचे सेवन करणे टाळावे?
जगभरातील अनेकांचे आवडते पेय म्हणजे कॉफी. चहा आणि इतर पेयांसोबतच कॉफीसुद्धा अतिशय आवडीने प्यायली जाते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी काहींना कॉफी लागतो. कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची चांगली सुरुवात होत नाही. कॉफीमध्ये असलेले कॅफिन हे जगभरात सगळ्यात जास्त वापरले जाणारे ‘सायकोॲक्टिव्ह’ द्रव्य आहे. कॉफीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर शरीरास आवश्यक असलेले पोषक घटक आढळून येतात. पण बऱ्याचदा काहींना उपाशी पोटी कॉफी पिण्याची सवय असते. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यामुळे कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनच्या नैसर्गिक चक्रात अडथळा निर्माण होतात. ज्याच्या परिणामामुळे शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. कॅफिनमुळे चयापचय क्रिया आणि मेटाबॉलिज्म वेगाने वाढते, ज्याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन दैनंदिन आहारात जास्त कॉफीचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कॉफी पिणे योग्य की अयोग्य? कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचा पोट आणि पचनावर कसा परिणाम होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
लघवीला कायमच उग्र वास येतो? दुर्लक्ष करणं ठरेल धोक्याचे! उन्हाळ्यात वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका
रिकाम्या पोटी कॉफी पिणे प्रत्येकासाठी हानिकारक ठरत नाही. पण ज्या व्यक्तींची पचनक्रिया अतिशय संवेदनशील आहे, अशांसाठी कॉफी घातक ठरू शकते. कॉफी पचनसंस्थेतील गॅस्ट्रिन हार्मोनला उत्तेजित करते, ज्याच्या परिणामामुळे हायड्रोक्लोरिक ॲसिड पोटामध्ये जास्त प्रमाणात वाढू लागते. पोटात अन्नाचा एकही कण नसताना कॉफीचे सेवन केल्यास ॲसिडची पातळी झपाट्याने वाढू लागते. पोटात वाढलेले ॲसिड पोटाच्या आतील स्तराचे गंभीर नुकसान करते. यामुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होतात.
लहान मुलांना जास्त चहा किंवा कॉफीचे सेवन करण्यास देऊ नये. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. दिवसाला ४०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पण त्यापेक्षा जास्त कॉफी अजिबात पिऊ नये. याशिवाय गर्भवती महिलांनी दिवसाला २०० मिलीग्रामपेक्षा कमी कॅफिनचे सेवन करावे. वारंवार कॉफी किंवा चहाचे सेवन केल्यास निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे, हाडांची झीज होणे इत्यादी समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते.
सकाळी उठल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफीचे सेवन करू नये. सकाळचा नाश्ता केल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. उठल्यानंतर लगेच चहा कॉफीचे सेवन केल्यास पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतात. कॉफी प्यायल्यामुळे शरीराला जितके फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. त्यामुळे सतत कॉफी पिऊ नये. झोपण्याच्या ६ तासांआधी कॉफी किंवा कॅफिन असलेल्या पेयांचे अजिबात सेवन करू नका. कॉफी पिण्याआधी कोणते फळ किंवा बिस्कीट खावे. यामुळे अपचाच त्रास अजिबात होत नाही.
Ans: उपाशी पोटी कॉफी पिणे काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते, कारण यामुळे अॅसिडिटी आणि पोटात जळजळ होऊ शकते.
Ans: कॅफिन पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊन अॅसिडिटी, गॅस किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
Ans: हो, काही लोकांना कोणताही त्रास होत नाही. हे व्यक्तीनुसार बदलते.






