आपल्या रोजच्या जीवनात काही वेळेस विविध स्वरूपाच्या गोष्टीत घडत असतात. काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही अशुभ संकेत देत असतात. आपल्या पैकी बऱ्याच जणांना या संकेताबदल माहिती नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली की आपण घाबरून जातो. आणि काही वेळेस चागले संकेत असताना आपण त्याला अशुभ मानतो तर काही वेळेस त्याचे उलटेसुद्धा होत असते.
आज पण अशाच काही संकेताबदल बोलणार आहोत. ते अशुभ आहेत का शुभ हे पण जाणून घेणार आहोत. रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे की आरसा फुटणे, दूध फाटणे तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे. या सारख्या घटना घडल्या कि आपल्याला या संकेताचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि त्याबदल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो.
बऱ्याच वेळेस मांजर आडवे जाते आणि त्या वेळेस बरेच व्यक्ती आपल्या मनात ही गोष्ट ठेऊन पुढील काम करत राहतात. या काही घटना ज्या घडत असतात त्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे काही संकेत देत असतात. मग ते संकेत काही वेळेस शुभ असतात आणि काही वेळेस अशुभ असतात. दूध उतू जाणे अशुभ की शुभ हे पण जाणून घेऊ.
जर आपल्या हातून नकळत जर दूध उतू गेले तर ते शुभ संकेत असते. याचा अर्थ असा होतो की आपल्या भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा बऱ्याच दिवसापासून अडलेले काम पूण होऊ शकते. थोडक्यात काय तर दूध उतू जाणे चागले असते. पण ते दूध नकळत उतू गेले तर चांगले असते. पण आपण जाणूनबुजून उतू घालवले तर ते चुकीचे संकेत असतात.
अजून एक गोष्ट म्हणजे जर का दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. आपल्या हातून जर नकळत दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते. याचा अर्थ भविष्यात येणारे संकट याची चाहूल आपल्या देत असते. जसेकी आपल्याला मिळणारे काम दुसऱ्याला मिळणे; एखादा अपघात होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर आर्थिक समस्यासुद्धा जाणवू शक्यते. अशा काही अशुभ गोष्टी आपल्या सोबत घडू शकतात.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही.