(फोटो सौजन्य: istock)
पायांमध्ये सूज येणे
कोणतीही दुखापत न होता जर तुम्हाला पायांमध्ये सतत वेदना जाणवत असतील, पायांना सूज येत असेल तर हे किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते. किडनी जेव्हा खराब होऊ लागते, तेव्हा ती शरीरात योग्यरित्या कार्य करत नाही. यामुळे शरीरातून अतिरिक्त सोडियम आणि पानी बाहेर पडत नाही ज्यामुळे हे द्रव पदार्थ पायांच्या खालच्या भागात जमा होऊ लागतात. यामुळेच पायांना सूज येऊ लागते.
त्वचेवर खाज येणे
त्वचेवर सतत खाज सुटणे फक्त एलर्जी किंवा कोणत्या इंफेक्शनचे लक्षण नसून यामागे किडनीचा आजारही दडलेला असू शकतो. शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. अशात जर किडनी खराब होऊ लागली तर टॉक्सिन्स शरीरातच साठू लागतात. रक्तात विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू लागले की त्वचेवर खाज सुटू लागते. यामुळे त्वचा कोरडी पडते आणि यावर पुरळ येऊ लागतात.
लघवीमध्ये बदल
अचानक सारखे लघवीला येणे, लघवीतून फेस किंवा रक्त येणे. हे लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे आणि शरीरात विषारी द्रव्ये साचल्यामुळे होते. किडनीच्या आजारात बऱ्याचदा डोळ्यांखाली सूज देखील येऊ लागते.
डाॅक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?
जर तुम्हाला आपल्या शरीरात ही लक्षणे आठवडाभरापासून सतत दिसून येत असतील तर कोणताही वेळ वाया न घालवता तुम्ही लगेच यावर डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तुम्ही KFT (Kidney Function Test), युरिन टेस्ट आणि ब्लड प्रेशर तपासणी करु शकता. किडनीच्या आजारापासून जर स्वत:चे संरक्षण करायचे असेल तर आजपासून आपल्या आहारात मीठाचे प्रमाण कमी करा, जास्तीत जास्त पाणी प्या आणि लक्षणे आढळल्यास रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.






