
एड्स हा रोग 1980च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका उद्भवतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना समाजात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते चारपैकी एका जणाला, म्हणजे तब्बल 94 लाख लोकांना या रोगाची लागण झाल्याची माहिती नसते. त्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे.
HIV+ लोकांच्या आसपास वावरल्याने AIDS होऊ शकतो
एखाद्या व्यक्तीला अगदी 10-15 वर्षं या रोगाची लक्षणं जाणवत नाहीत. त्यांना ताप, डोकेदुखी, पुरळ, घसा खवखवणं ही साधारणपणे फ्लूची लक्षणं आढळतात.
चारपैकी एका व्यक्तीला HIVची लागण झाल्याची कल्पना नसते.