पायात अशक्तपणा, मुंग्या, बधिरपणा जाणवतो? मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Spine Back Pain: हर्निएटेड लंबर डिस्क, लंबर स्पाइनल स्टेनोसिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस इत्यादी मणक्यासबंधित आजार झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – istock)
मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
Published on: 
Updated on: 
  • पाठदुखी आणि पायात अशक्तपणा येण्याची मणक्याशी संबंधित प्रमुख कारणे:

  • पाठदुखीची लक्षणे आणि त्यावरील उपाय?

  • मणक्यासबंधित आजार कोणते?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. तरुण वयातच मानदुखी आणि पाठदुखीच्या समस्या वाढू लागल्यानंतर शरीरात अस्वस्थपणा वाढतो आणि दैनंदिन जीवनातील रोजची कामे करताना अनेक अडथळे निर्माण होतात. आकडेवारीनुसार, 80 टक्के लोकांना आयुष्यात किमान एकदा तरी मानदुखीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्याऐवजी घरीच उपाय करतात. पण काहीवेळा चुकीचे उपाय केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.

मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
Health news: आजारांना दूर ठेऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी फुफ्फुसांची काळजी घेणे का गरजेचे बनत आहे?

पाठदुखी स्नायूंच्या ताणामुळे होते आणि विश्रांतीने बरी होऊन जाईल, असे बऱ्याचदा वाटते. पण असे नसून पाठदुखीमुळे मणक्याचे आजार वाढण्याची शक्यता असते. पाठदुखीसोबत पायांमध्ये अशक्तपणा किंवा बधिरपणा जाणवत असल्यास दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता असते. मणक्यातील मज्जातंतूंवर गंभीर दाब आल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. चला तर जाणून घेऊया मणक्याचे आजार झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती.

पाठदुखी आणि पायात अशक्तपणा येण्याची मणक्याशी संबंधित प्रमुख कारणे:

मणक्याच्या चकतीमधील मऊ गर बाहेरच्या आवरणातून बाहेर येऊन जवळच्या मज्जातंतूच्या मुळावर तणाव येतो. यामुळे पायात तीव्र वेदना होणे, मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसू लागतात. लंबर स्पाइनल स्टेनोसिस झाल्यानंतर मणक्याचे हाड अरुंद झाल्यामुळे पायांकडे जाणाऱ्या मज्जातंतूंवर जास्तीचा तणाव येतो. यामुळे दोन्ही पायांमध्ये उभे राहताना किंवा चालताना वेदना होतात.

स्पॉन्डिलोलिस्थेसिस झाल्यानंतर मणक्याचे एक हाड खालच्या हाडावरून पुढे सरकते, ज्यामुळे शेजारच्या मज्जातंतू दाबल्या जातात. यामुळे कंबरदुखीसोबतच पायात अशक्तपणा जाणवू लागतो. तर काहीवेळा फ्रॅक्चर, स्पाइनल ट्यूमर, कॉडा इक्विना सिंड्रोम आणि स्पाइनल ऑस्टियोमायलाइटिस यांसारख्या गंभीर आजारांमुळे पाठदुखी होते.

मणक्याच्या आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
Arthritis: संधिवाताचा त्रास होतोय? वेदना आणि सूज कमी करण्यासाठी जाणून घ्या हे महत्त्वाचे उपाय!

२० वर्षांपेक्षा कमी किंवा ७० वर्षांपेक्षा जास्त सुरु झालेली पाठदुखी शरीरासाठी घातक आहे. अपुऱ्या विश्रांती किंवा ६ आठवड्यांपेक्षा जास्त वेळ पाठदुखी होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. कॅन्सर किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी, ऑस्टियोपोरोसिस, तोंडावाटे स्टिरॉइड्सचा दीर्घकाळ वापर आणि शरीराची संवेदना किंवा हालचालींची क्षमता हळूहळू कमी होऊन जाते. लघवी करताना नवीन अडचण येणे, लघवी अडकून राहणे किंवा नकळत लघवी व शौच होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.