रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणापर्यंत लहान मुलांना कायमच चविष्ट आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी मुलांना एकतर विकतचे पदार्थ आणून खाण्यास दिले जातात किंवा घरी कायमच बनवले जाणारे पदार्थ खाण्यास दिले जाते. तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चपाती रोल्स बनवू शकता. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते. रात्रीच्या जेवणात चपाती शिल्लक राहिल्यानंतर त्यापासून नेमकं काय करावं सुचत नाही. शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी या पद्धतीने चपातीचे वेगवेगळे पदार्थ बनवून खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. सकाळच्या वेळी खूप जास्त घाई असते. घाईमध्ये काय बनवावं सुचत नाही. चला तर जाणून घेऊया चपाती रोल्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – AI)
भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी






