भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
जेवणाच्या ताटात प्रत्येकाला भात कायमच लागतो. भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखे अजिबात वाटत नाही. डाळभात, आमटी भात किंवा पुलाव भात इत्यादी भाताचे प्रकार कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक भाताचे प्रकार खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसापासून ऑरेंज राईस बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. संत्र्याची चटपटीत चव, सुगंधी मसाले आणि बासमती तांदळाचा वापर करून बनवलेला पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी काय बनवावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट ऑरेंज राईस बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






