सतत साबूदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर साबूदान्याचे प्रकार खाऊन पित्त होतं. त्यामुळे वेगळ काय करायचं हा प्रश्न असतो. आज नवरात्रीत करता येईल अशी एक खास रेसिपी पाहुयात.
अरबी कोफ्ता बनवण्यासाठी साहित्य
अरबी (अळुच्या मुंडल्या) 250 ग्रॅम
गव्हाचे पीठ 3 टीस्पून
हिरवी मिरची १
अर्धा इंच आले
ओवा 1 टीस्पून
सैंधव मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
अरबी कोफ्तासोबतची चटणीचे साहीत्य
पुदीना पाने,दही 100 ग्रॅम,काकडी 50 ग्रॅम,
अरबी कोफ्ता कृती
कोफ्ते बनवण्यासाठी प्रथम अरबी उकडून त्याची साल काढून घ्या.
त्यानंतर त्यात गव्हाचे पीठ, हिरवी मिरची,आले, ओवा आणि सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.
तळहाताला तेल लावून मिश्रणातील छोटा गोळा घेऊन कोफ्ते बनवून घ्या.
कोफ्ते तुम्हाला आवडतीन त्या आकारात बनवा.
कढईत थोड्या तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
Web Title: Make arabic koftas for fasting on navratri in a very easy way nrrd