
उन्हाळ्यात अशा पेयाचे सेवन करणे खूप महत्वाचे आहे, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते तसेच तुम्ही हायड्रेटेड राहता. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले हे पेय अगदी सहज तयार करता येते. चला जाणून घेऊया त्याची रेसिपी.
व्हिटॅमिन-सी हा आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. पपईबरोबरच अंजीर, बदाम आणि जवसाच्या बियांचे सात गुणधर्म एकत्र करून हे पेय आणखी फायदेशीर ठरते.