गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक घटकांची गरज असते. कारण यादिवसांमध्ये घामावाटे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर पडून जातात. ज्याच्या परिणामामुळे शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. डिहायड्रेशन झाल्यामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढतो. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे आहारात सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला साखर, तूप किंवा गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे प्रोटीन लाडू शरीरात ऊर्जा कायम टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक लाडू खाल्ल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. चला तर जाणून घेऊया लाडू बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी






