फोटो सौजन्य - Social Media
बटाट्यापासून बनवा टेस्टी डोनट्स; जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी
नाश्ता सकाळचा असो किंवा संध्यकाळचा, तो मात्र स्वादिष्ट असलाच पाहिजे. या नाश्त्यामध्ये आणखीन स्वाद भरण्यासाठी ही रेसिपी नक्कीच तुमच्या कामी येणार आहे. ही रेसिपी फक्त तुमचा नाश्ताच नाही तर दुपारच्या जेवणानंतरचा स्नॅक्स म्हणूनही उपयोगात येणार आहे. याची चव जरी इतर डोनट्सपेक्षा वेगळी असली तरी इतर डोनट्सला उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून ही रेसिपी नक्कीच टफ देणार आहे. ऑफिसमध्ये समोसे, पकोडे तर चालूच असतं, पण घरी काय? घरी बनवलेला हा उत्तम खाद्य पदार्थ तसेच डोनट्सचा नवीन आविष्कार लोकांच्या स्वादाची भूक मिरवणार आहे.
घरामध्ये तुम्ही एकट्या स्वयंपाक करणाऱ्या आहात. घरातून नेहमीच आपल्याला काही ना काही नवीन बनवण्याची फर्माईश येत असते. त्यामुळे काही ना काही तरी नवीन खाद्य पदार्थाच्या रेसिपीची गरज आपल्याला नक्कीच भासते. चला तर मग जाणून घेऊया अशा युनिक आणि स्वादिष्ट रेसिपीबद्दल. या लेखामध्ये आपण बटाटा आणि रव्यापासून बनणाऱ्या डोनट्सच्या रेसिपीविषयी जाणून घेणार आहोत. ऐकण्यास जरी नवल असले तरी या नव्या अविष्काराचा स्वाद लाजवाब आहे. खरचं, याच्या स्वादाला तोड नाही.
हे देखील वाचा : ‘या’ देशात आहे जगातील सर्वात मोठी आर्ट गॅलरी; एक चित्र विकले जाते करोडोंना
साहित्य:
कृती:
सर्वप्रथम, मध्यम आकाराचे बटाटे सोलून एका पाण्याच्या बाऊलमध्ये ठेवा. बटाटे किसून घ्या आणि एका बाजूला ठेवा. या दरम्यान, कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आले सुद्धा किसून ठेवा.
एका पॅनमध्ये 1 कप पाणी घालून उकळा. उकळलेल्या पाण्यात किसलेले बटाटे घाला आणि त्यांना मऊ होईपर्यंत शिजवा. शिजवलेल्या बटाट्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, राई, आले, मिरची फ्लेक्स, तिळ, आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण 5-6 मिनिटं शिजवा. नंतर, पॅनमध्ये रवा घालून बटाट्याच्या मिश्रणात व्यवस्थित मिसळा. करछीच्या मागील भागाने मिश्रण दबून, एकत्र करा. यामुळे मिश्रणात होणाऱ्या गाठी तुटतील. हे मिश्रण पॅनच्या कडा सोडेपर्यंत शिजवा.
मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात ताजं कोथिंबीर घालून मिक्स करा. मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. थंड झालेल्या मिश्रणात 1 मोठा चमचा तेल घालून चांगले मळून घ्या. मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि त्याला वड्यांसारखा आकार द्या, मध्यभागी छिद्र करा. अशा प्रकारे सर्व गोळ्यांपासून डोनट्स तयार करा. एका कढईत तेल गरम करून त्यात ते डोनट्स घाला. त्यांना सुनहरे तपकिरी होईपर्यंत तळा. तळलेले डोनट्स काढून पेपर टॉवेलवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. तुमचे स्वादिष्ट बटाट्याचे डोनट्स तयार आहेत. हे डोनट्स चटणी आणि चहा सोबत सर्व्ह करा आणि आनंद घ्या. हे डोनट्स नाश्त्याला, दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे.