(फोटो सौजन्य: Pinterest)
जनरल तिकिटासाठी स्टेशनला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरच 1 मिनिटांत होईल बुक; रेल्वे देते 3% सूट
आपल्या ट्रिपमध्ये तुम्ही बाजार फिरु शकता, यमुना किनारी बसून संध्याकाळी सूर्यास्ताची मजा लुटणे आणि लहान दुकानातून पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेणे. या गोष्टी साध्या असल्या तरी मनाला वेगळा आनंद आणि शांतता देऊन जातात. शहराच्या गजबटापासून, तेजापासून दूर जेव्हा तुम्ही इथे साध्या गोष्टींमध्ये आनंद शोधता तेव्हा सहलीची मजा नक्कीच द्वगुणित होऊन जाते. इथे फक्त मंदिराचे दर्शनच नाही तर इथली संस्कृती पाहण्याचा, अनुभवण्याचा आनंद तुम्ही लुटु शकता. असं म्हणतात, सहल फक्त थकवा दूर करत नाही तर आपल्या नवनवीन ठिकाणाविषयी अनेक गोष्टी शिकवून जाते.
यमुनेच्या काठावर संध्याकाळची मजा
मंदिरातील वर्दळीपासून दूर यमुनेच्या काळावर तुमची संध्याकाळ घालवा. संध्याकाळी इथले साैंदर्य आणखीनच सुंदर दिसते. घाटावर बसून सभोवतालचे निरीक्षण करणे आणि भक्तिपूर्ण आरतीमध्ये सहभागी होणे तुमच्या मनाला एक वेगळीच शांती देऊन जाईल.
ब्रजच्या गल्ल्यांमध्ये पायी फिरा
जी मजा लहान गल्ल्यांमध्ये फिरण्यात आहे ती मोठ्या शहरांमध्ये नाही… लहान दुकाने, घरे, मंदिर आणि तिथे गजबजणारा लोकांचा आवाज, रस्त्यावर भजनांचा आवाज आणि मुलांचे बागडणे हे सर्वांचाच आपल्या प्रवासात अनुभव घेणे फार महत्त्वाचे आहे.
ब्रजची चव चाखा
फिरायला गेलात आणि तेथील पदार्थांचा आस्वाद घेतला नाही असं तर होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी वेगळी खाद्यसंस्कृती असते. कुठेही फिरायला गेल्यावर त्या ठिकाणाच्या पारंपारिक पदार्थांचा आस्वाद हा जरुर घ्यायला हवा. इथे तुम्ही लहान दुकानांमधून कचोरी, जलेबी, पेढे किंवा इतर पदार्थांची चव चाखू शकता.
नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
भजनात सामील व्हा
जन्माष्टमीनिमित्त मथुरा-वृदांवनात अनेक ठिकाणी भजन कार्यक्रम आयोजित केला जातो. काहीवेळ या भजनात बसून देवाच्या भक्तीत लीन व्हा. तेथील वातावरण, लोकांचा श्रद्धा, पूजा सर्व गोष्टी जवळून पाहा , त्याचा अनुभव घ्या. तथापि, लक्षात घ्या, जन्माष्टमीदरम्यान मथुरा-वृदांवनात भाविकांची भरपूर गर्दी पाहायला मिळते, ज्यामुळे सुरुवातीपासूनच सर्व बुकिंग आणि नीट प्लॅनिंग करुन ठिकाणांना भेट द्या.






