RailOne App
RailOne App ॲपचा करा वापर
रेल्वे स्टेशनवरील लांब रांगेपासून वाचवण्यासाठी रेल्वेने RailOne App ही सुविधा प्रवाशांसाठी सादर केली आहे. तंत्रणाज्ञाचा वाढता वापर पाहता आजकाल सर्वच गोष्टी मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन करणे सहज झाले आहे. अशात रेल्वेही यात मागे राहिली नाही. रेल्वेच्या RailOne App ॲपचा वापर करुन तुम्ही ऑनलाईन तिकिट, मंथली पास बुक करु शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला खास डिस्काऊंट देखील देण्यात येईल.
तिकिटावर ३% डिस्काऊंट
डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने RailOne App वर तिकीट बुकिंगवर ३% सूट दिली आहे. याचाच अर्थ या नवीन सुविधेच्या मदतीने लांब रांगेत उभे राहण्याचे तुमचे कष्ट वाचतील शिवाय तुमचे पैसेही जास्त खर्च होणार नाहीत. तुम्ही या ॲपवर यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरून सहजपणे डिजिटल पेमेंट करू शकता. रेल्वेची इच्छा आहे की जास्तीत जास्त प्रवाशांनी डिजीटल तिकिट बुकिंगमध्ये भाग घ्यावा.
RailOne App ॲपवर तिकिट बुक कसे करावे?






