मुंबई– कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या तिथीला दर महिन्याला कालाष्टमी (Kalashtami 2023) साजरी करण्यात येते. कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवाचं व्रत करण्यात येतं आणि पूजाही (pooja rituals) करण्यात येते. धार्मिक मान्यतेनुसार, अष्टमीच्या तिथीला भगवान काळभैरव हे प्रगट झाले होते, अशी मान्यता आहे. या दिवशी पूजा केल्यानं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, अशी मान्यता आहे. या वेळी कालाष्टमी १० जून म्हणजेच आज साजरी करण्यात येणार आहे. कालाष्टमीचं व्रत कसं करायचं, त्याचा मुहुर्त काय, पूजा विधी काय, हे जाणून घेऊयात
कालाष्टमी व्रताचा मुहुर्त
आषाढ कृष्म अष्टमी
प्रारंभ- १० जून, संध्याकाळी २ वाजून ०६ मिनिटांनी सुरुवात
समाप्त- ११ जून, दुपारी १५ वाजून ५ मिनिटांपर्यंत
कालाष्टमी व्रताचं महत्त्व
काळभेरव हे भगवान शंकराचं रुप आहे. शंकराचा कोणताही भक्त या दिवशी निष्ठा आणि भक्तीनं काळभैरवाची उपासना करेल, त्याच्या जगण्यातील नकारात्मकता दूर होते, अशी भावना आहे. उपासकाच्या जगण्यात सुख-समृद्धी येते, असंही सांगण्यात येतं.
कालाष्टमीला कशी करावी पूजा?
या दिवशी शंकराची काळभैरवाच्या रुपात पूजा केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्थान करुन व्रताचा संकल्प सोडण्यात येतो. त्यानंतर शंकराच्या किंवा काळभैरवाच्या मंदिरात जाऊन पूजा करावी. संध्याकाळच्या वेळेला शंकर, पार्वती आणि भैरव यांची पूजा करावी. काळभैरव हा तांत्रिकांचा देव असल्यानं त्याची पूजा रात्रीच्या वेळीच करण्यात येते. काळभैरवाच्या पूजेत दीवा, काळे तीळ, उडीद आणि मोहरीच्या तेलाचा वापर आवश्यक असतो. पूजा झाल्यानंतर काळ्या कुत्र्याला गोड पोळ्या खाऊ घालाव्यात.
कालाष्टमीच्या दिवशी हे टाळा
कालाष्टमीच्या दिवशी मद्य सेवन करु नये.
मासाहारी जेवणही या दिवशी करु नये.
या दिवशी अहंकार दाखवू नका
घरातील मोठ्या व्यक्ती आणि महिलांचा अपमान कर नका
या दिवशी टोकदार वस्तूंचा वापर करण्यास मनाई आहे.