दरवर्षी १२ मे ला मदर्स डे साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक आईला समर्पित आहे. आयुष्यात आलेल्या प्रत्येक कठीण प्रसंगातून आई आपल्या मुलांना नेहमीच वाचवते. प्रत्येकाचे जीवन सुलभ करण्यासाठी ती आपल्या मुलांना धडे देत असते. आईने दिलेले हे धडे वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आपल्या कामी येतात.आयुष्यात आपल्या मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांना लहानाचे मोठे करेपर्यंत आईला अनेक संकटाना सामोरे जावे लागते. मात्र ती सर्व संकट पार करून आई आपल्या मुलांना छान आनंदाने वाढवते. आईकडून मिळालेला प्रत्येक धडा हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कामी येतो. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आईने दिलेले खास धडे जे आयुष्य जगत असताना आपल्या सगळ्यांच्या उपयोगी पडतील. चला तर मग जाणून घेऊया..
दयाळू असणे फार महत्वाचे आहे:
आई आपल्या मुलांना एखाद्याबद्दल सहानुभूती बाळगण्यास मदत करते. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही चांगलं यश मिळवलं तरी जर तुमच्यामध्ये सहानभूती नसेल तर तुमची चांगले व्यक्ती नाही. त्यामुळे आईने दिलेला हा धडा म्हातारपणी नक्कीच कामी येतो. सहानुभूती आणि सहानुभूतीची भावना आईमध्ये दिसून येतो. तेच संस्कार ती आपल्या मुलांवर नेहमीच करत असते.
संयमाने वागणे:
आयुष्यामध्ये संयम फार महत्वाचा आहे. लवकर यश मिळाले नाही तर काहीजण घाबरून जातात. पण असे नसते. लवकर यश मिळवण्यासाठी काही गोष्टी साध्य करून दाखवाव्या लागतात. म्हणूनच आई आपल्या मुलांना नेहमीच धीर देत असते. प्रत्येक समस्या उत्कटतेने कशी सोडवायची हे आईला माहित असते त्यामुळे आई प्रत्येक वेळी आपल्या मुलांना धीर देते. ज्याच्या फायदा मुलांना आयुष्यभर होतो.
दररोज नवीन काहीतरी शिकणे:
आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी दररोज नवनवीन गोष्टी शिकणे गरजेचे आहे.आपली मुले नवीन प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद हा आईला होतो. प्रत्येक वेळचा सदुपयोग करणे फार गरजेचे आहे. गेलेली वेळ पुन्हा परत येणं अशक्य आहे. त्यामुळे आईसुद्धा आपल्या मुलांना सतत काहींना काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी सांगते. वय कितीही असो, नोकरी कुठलीही असो, शिकण्याची जिद्द जिवंत ठेवणे हे आजच्या युगात फार गरजेचे आहे.
कोणतंही काम लहान किंवा मोठं नसत:
घरातील किंवा बाहेरील कोणतंही काम करत असताना सगळ्यात पहिली आईची आठवण येते. त्यावेळी आईने दिलेले धडे आठवू लागतात. आयुष्यात जगत असताना अनेक छोटी मोठी कामे आपल्या वाट्याला येतात. हीच कामे करत आपल्या पुढे जायचे असते. त्यामुळे प्रत्येक काम हे लहान किंवा मोठं नसत, अशी शिकवण नेहमीच आई आपल्या मुलांना देत असते. बदलत्या वेळेनुसार मुलांदेखील घरातली कामे करावी लागतात, अशी वेळी आईने दिलेली आठवण फार मोलाची ठरते.