कथाकार जया किशोरी (Jaya Kishori) यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. त्या मोटिवेश्नल स्पीकर असून त्यांनी अनेकांना प्रेरित केले आहे. अनेकदा जया किशोरी सोशल मीडियावर आपले मत शेअर करत असतात.नुकतीच जया किशोरी यांनी सोशल मीडियावर एक मुलाखत दिली आहे. यामध्ये जया किशोरी यांनी छोटी बहीण चेतना हिच्या सवयींबद्दल सांगितले आहे. प्रत्येक मोठ्या बहिणीला छोट्या बहिणीच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जया किशोरी यांचे छोटी बहीण चेतना हिच्यावर खूप प्रेम आहे पण तिच्या काही सवयी जया किशोरी यांना आवडत नाहीत. चला तर जाणून घेऊया जया किशोरी नेमकं काय म्हणाल्या.
जया किशोरी यांच्या छोट्या बहिणीचे नाव चेतना शर्मा असे आहे. चेतना एक गायिका आहे. हा तिचा छंद असल्याने तिने आत्तापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. प्रत्येक घरात ज्याप्रमाणे मोठ्या आणि छोट्या बहिणीची कथा असते तशीच कथा जया किशोरी आणि चेतना शर्मा यांची आहे. प्रत्येक लहान बहीण आपल्या मोठ्या बहिणीचे कपडे घालते. असेच कपडे चेतनाने सुद्धा वापरले आहेत. मुलाखतीमध्ये जया किशोरी यांनी आपल्या लहान बहिणीबद्दल सांगितले तेव्हा त्या म्हणाल्या, अनेकदा आमच्यात कपड्यांवरून भांडण झाली आहेत.चेतनाला तिचे कपडे आवडत नाहीत. चेतनाने अनेकदा माझ्यासाठी आणलेले कपडे स्वता घातले आहेत.
[read_also content=”ओटझेम्पिक म्हणजे काय? वजन कमी करण्यासाठी व्हायरल होतोय ट्रेंड, आहारतज्ज्ञांनी दिली माहिती https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-otzempic-the-trend-to-lose-weight-is-going-viral-dietician-informed-537146.html”]
पुढे बोलताना जया किशोरी म्हणाल्या. चेतनाच्या कपाटात अजूनही माझेच कपडे आहेत. पण अनेक घरांमध्ये लहान भावंडाना त्यांच्या मोठ्या भावंडांचे कपडे घालायला आवडतात. घरामध्ये लहान भावंडाना कपड्यांपासून. खेळण्यांपर्यंत सगळ्या वस्तू दिल्या जातात. अनेकदा मोठ्या बहिणी लहान भावंडाना वस्तू देताना त्यांच्यावर रागवतात, त्यांच्याशी भांडण करतात पण शेवटी कोणतीही वस्तू असली तर आपल्या लहान भावंडाला देतात. मोठ्या बहिणीचा आधार कायम छोट्या बहिणीच्या सोबत असतो. त्यामुळे प्रत्येक कठीण प्रसंगात मोठी बहीण छोट्या बहिणीला साथ देते.